
देशांतर्गत विक्रीसोबतच निर्यात धरून कंपनीची एकूण विक्री 1,59,500 युनिट्स इतकी झाली आहे. याच वर्षात स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाने 2 मिलियन ‘मेड-इन-इंडिया’ वाहनांचे उत्पादन पूर्ण करून आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यामुळे भारतातील उत्पादन क्षमता आणि स्थानिकीकरणाची ताकद अधोरेखित झाली आहे.
भारतासाठी खास विकसित करण्यात आलेला MQB-A0-IN प्लॅटफॉर्म हा स्कोडा आणि फॉक्सवॅगनच्या स्थानिक मॉडेल्सचा कणा ठरला आहे. याच धोरणामुळे कंपनीला खर्च नियंत्रण, स्केल आणि दर्जा यांचा समतोल साधता आला आहे.
दरम्यान, SAVWIPL ने निर्यातीच्या आघाडीवरही मोठी मजल मारली असून, आतापर्यंतची एकूण निर्यात 7.15 लाख युनिट्सच्या पुढे गेली आहे. यामुळे भारत हे या समूहाचे एक महत्त्वाचे जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थापित झाले आहे. विशेषतः ASEAN देशांमध्ये प्रवेश करत कंपनीने आपली आंतरराष्ट्रीय उपस्थिती वाढवली आहे.
स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO पियुष अरोरा यांनी सांगितले, “2025 हे वर्ष आमच्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीचे प्रतीक ठरले. ‘मेक-इन-इंडिया’ धोरण, सखोल स्थानिकीकरण आणि मजबूत उत्पादन पाइपलाइन यामुळे उत्पादन, विक्री आणि निर्यातीत ही वाढ शक्य झाली. 2026 मध्ये प्रवेश करताना आमचा फोकस पोर्टफोलिओ विस्तार, ग्राहकांच्या गरजेनुसार नेटवर्क वाढवणे आणि भारताला जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र म्हणून अधिक मजबूत करणे हाच आहे.”
फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक
2025 मध्ये समूहातील विविध ब्रँड्सनी उल्लेखनीय कामगिरी केली.
फॉक्सवॅगनने प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये आघाडी कायम राखली. व्हर्टसने YTD आधारावर 38% सेगमेंट शेअर मिळवला, तर गोल्फ GTI ची पहिली बॅच लाँचनंतर काही दिवसांतच विकली गेली.
स्कोडा ब्रँडने 107% वाढ नोंदवली. सब-4 मीटर कायलाकची प्रचंड मागणी आणि ऑक्टेव्हिया RSचे दमदार पुनरागमन यामागील प्रमुख कारणे ठरली.
कंपनीने भारतभर 700 हून अधिक कस्टमर टचपॉइंट्स उभारून आपले विक्री व सेवा नेटवर्क अधिक मजबूत केले आहे.
प्रीमियम सेगमेंटमध्ये ऑडीने Q7 सिग्नेचर एडिशन, Q3 आणि Q5 सिग्नेचर लाईन्स सादर केल्या, तर RS Q8 Performance ने परफॉर्मन्स आणि लक्झरीचा नवा मापदंड निर्माण केला.
लॅम्बॉर्गिनीने टेमेरारियो लॉंच केली, तर रेव्ह्यूल्टोला ‘सुपर कार ऑफ द इयर’चा किताब मिळाला. पॉर्शेने भारतातील उपस्थिती वाढवत 13 टचपॉइंट्सपर्यंत विस्तार केला.
याशिवाय, बेन्टली सहावा ब्रँड म्हणून SAVWIPL मध्ये सहभागी झाला असून मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली येथे नवीन डीलरशिप्स सुरू करण्यात आल्या आहेत.