भारतीय ऑटोमोबाईल बाजारात माइल्ड हायब्रिड गाड्यांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आता ‘स्ट्रॉंग हायब्रिड’ वाहनांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्या या तंत्रज्ञानामध्ये टोयोटा, मारुती सुझुकी आणि होंडा या तीन प्रमुख कंपन्यांचा दबदबा आहे. लवकरच रेनोल्ट कंपनीसुद्धा डस्टर हायब्रिडच्या माध्यमातून मोठ्या बॅटरी पॅकसह या सेगमेंटमध्ये उतरणार आहे. २०२६ च्या पहिल्या सहामाहीतील विक्रीची आकडेवारी पाहता या बाजारात टोयोटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
टोयोटाच्या गाड्यांची बाजारावर हुकमत
भारतीय बाजारात स्ट्रॉंग हायब्रिड सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार म्हणून टोयोटा इनोव्हा हायक्रॉस अग्रस्थानी आहे. २०२६ च्या पहिल्या ६ महिन्यांत इनोव्हा हायक्रॉसचे तब्बल २७,८१२ युनिट्स विकले गेले असून, एकट्या या मॉडेलचा बाजारात ४८% हिस्सा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत याच्या विक्रीत ६% घसरण झाली असली तरी ही कार अव्वल स्थानीच आहे.
दुसऱ्या क्रमांकावर टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर असून, याचे १८,५७७ युनिट्स विकले गेले आहेत. हायरायडरने ३२% मार्केट शेअर मिळवला असून वार्षिक आधारावर २३% ची भक्कम वाढ नोंदवली आहे.
इतर लोकप्रिय हायब्रिड मॉडेल्स आणि विक्रीची स्थिती
टोयोटा व्यतिरिक्त इतर ब्रँड्सच्या विक्रीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे,






