(फोटो सौजन्य-AI एआय)
कोमाकी SE Ultra:
कोमाकी SE Ultra ची एक्स-शोरूम किंमत ₹1.11 लाखांपासून सुरू होते. या स्कूटरमध्ये 7.2kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला असून कंपनीच्या दाव्यानुसार ती सिंगल चार्जमध्ये 418 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. याची टॉप-स्पीड 70kmph आहे. 50-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि 160mm ग्राउंड क्लीयरन्समुळे दैनंदिन वापरातही ती उपयोगी ठरू शकते.
BGauss C12 MaxR इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; प्रीमियम सेगमेंटमध्ये किंमत ₹1.45 लाखांपासून सुरु
सिंपल Ultra:
सिंपल Ultra ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹2.35 लाख आहे. यात 6.5kWh बॅटरी असून कंपनीकडून 400 किमीपर्यंत रेंजचा दावा केला जातो. 115kmph टॉप-स्पीडसह या स्कूटरमध्ये 26-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि 172mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही हे मॉडेल चर्चेत आहे.
कोमाकी XR7:
कोमाकी XR7 ची किंमत ₹91,499 पासून सुरू होते. 4.68kWh बॅटरीसह ती 322 किमीपर्यंत रेंज देत असल्याचा दावा आहे. 55kmph टॉप-स्पीड, 30-लिटर स्टोरेज आणि 165mm ग्राउंड क्लीयरन्स ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
फुल चार्जमध्ये 320 किमी रेंज! 34 लिटर बूट स्पेससह ओला S1 X Plus ठरतो डेली यूजसाठी खास
ओला S1 Pro Plus:
ओला S1 Pro Plus ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹1.74 लाख आहे. यात 5.3kWh बॅटरी असून 320 किमीपर्यंत रेंजचा दावा केला जातो. 128kmph टॉप-स्पीडसोबत 34-लिटर अंडरसीट स्टोरेज आणि 160mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो.
सिंपल One:
सिंपल One ची किंमत ₹2.04 लाखांपासून सुरू होते. यात 5kWh बॅटरी आणि 265 किमीपर्यंत क्लेम्ड रेंज आहे. 115kmph टॉप-स्पीड, 35-लिटर स्टोरेज आणि 172mm ग्राउंड क्लीयरन्स मिळतो. प्रत्यक्ष रेंज मात्र वापराची पद्धत, वेग आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.






