(फोटो सौजन्य-AI एआय)
रेनोल्टची विक्री 2,842 युनिट्स:
ऑगस्ट 2026 मध्ये रेनोल्टने भारतात एकूण 2,842 कार विकल्या. ऑगस्ट 2025 मध्ये कंपनीची विक्री 3,015 युनिट्स होती. यावेळी रेनोल्टच्या विक्रीत ट्रायबरचा सर्वात मोठा वाटा राहिला. कंपनीने ट्रायबरच्या 1,536 युनिट्सची विक्री केली. याशिवाय किगरच्या 474, क्विडच्या 426 आणि नव्या डस्टरच्या 406 युनिट्स विकल्या गेल्या.
नव्या डस्टरकडे लक्ष:
नवीन रेनोल्ट डस्टर लाँच होण्यापूर्वीपासूनच या SUVची ग्राहकांमध्ये उत्सुकता होती. पण ऑगस्ट 2026 मध्ये तिची विक्री 406 युनिट्स राहिली. त्यामुळे आगामी महिन्यांमध्ये डस्टरच्या विक्रीत किती वाढ होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कंपनीने भारतात आपल्या प्रोडक्शन लाइनअपचा विस्तार करण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.
निसानची विक्री 3,426 युनिट्स:
निसानसाठी ऑगस्ट 2026 मधील विक्रीची आकडेवारी लक्षणीय राहिली. कंपनीने भारतात एकूण 3,426 कार विकल्या. ऑगस्ट 2025 मध्ये निसानची विक्री फक्त 1,384 युनिट्स होती. त्यामुळे कंपनीच्या विक्रीत वर्षभराच्या तुलनेत 148% वाढ झाली. मॅग्नाइटसोबत ग्रॅव्हाइट आणि टेकटनच्या एंट्रीमुळे कंपनीच्या एकूण विक्रीला चालना मिळाली.
मॅग्नाइटची आघाडी, ग्रॅव्हाइटही जवळ:
निसान मॅग्नाइट ही ऑगस्टमध्ये कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. तिच्या 1,495 युनिट्स विकल्या गेल्या, तर ऑगस्ट 2025 मध्ये 1,384 युनिट्सची विक्री झाली होती. निसान ग्रॅव्हाइटनेही 1,440 युनिट्सची विक्री नोंदवली. दरम्यान, नव्याने आलेल्या निसान टेकटनची ऑगस्टमधील विक्री 491 युनिट्स राहिली. त्यामुळे आगामी काळात या नव्या मॉडेल्सच्या कामगिरीकडे लक्ष असेल.






