इथे GST कमी तिथे Tata च्या 'या' कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी
भारतीय बाजारात टाटा मोटर्सने दमदार कार ऑफर केल्या आहेत. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि अपेक्षेनुसार उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Tata Nexon. भारतामध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय कारपैकी एक Tata Nexon आता आधीपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे.
नवीन GST Rates लागू झाल्यानंतर या टाटा नेक्सॉनच्या किमतीत मोठी कपात झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना लाखो रुपयांपर्यंत फायदा होत आहे. विशेष म्हणजे, या कपातीत सर्वाधिक लाभ डीजल व्हेरिएंटला मिळाला आहे. चला, वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार नवीन किमती आणि मिळणाऱ्या फायद्याबद्दल सविस्तर पाहूया.
Tata Nexon पेट्रोल व्हेरिएंटच्या मॅन्युअल व्हर्जनसाठी नवीन GST दरानुसार किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. Smart व्हेरिएंटची जुनी किंमत 8 लाख रुपये होती, जी आता 7.32 लाख रुपये झाली आहे, म्हणजे 68,000 रुपयांची बचत. Smart Plus ची किंमत 8.90 लाखातून 8 लाख रुपये झाली आहे, ज्यामध्ये 90,000 रुपयांची बचत होते, तर Smart Plus S ची किंमत 9.20 लाख ऐवजी 8.30 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे, म्हणजे 90,000 रुपयांची बचत.
टाटा नेक्सॉनच्या Creative Plus आणि Fearless Plus पेट्रोल व्हेरिएंट (मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक) च्या किमतीत 1 लाखांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. टॉप-स्पेक Fearless Plus PS Dark DCT पेट्रोल व्हेरिएंटच्या किमतीत 1.25 लाखांची सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. शिवाय, एंट्री-लेव्हल स्मार्ट पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 68,000 रुपयाने स्वस्त झाला आहे. इतर सर्व पेट्रोल ट्रिम्सच्या किमतीत 80,000 पेक्षा रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे.
Tata Nexon च्या CNG व्हेरिएंटमध्येही ग्राहकांना मोठा फायदा मिळत आहे. Creative आणि Fearless CNG व्हेरिएंट्समध्ये किंमतीत 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक कपात झाली आहे. टॉप व्हेरिएंट Fearless Plus PS Dark CNG वर 1.24 लाख रुपयांपर्यंत पर्यंत बचत मिळत आहे. बेस-स्पेक Smart CNG आता 77,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर मिड-स्पेक Pure Plus आणि Pure Plus S CNG व्हेरिएंट्सवर 91,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत फायदा मिळत आहे.
डिझेल व्हेरिएंटमध्ये सर्वात मोठी कपात होत आहे. टाटा नेक्सॉनच्या टॉप-स्पेक Fearless Plus PS AMT Dark डिझेल व्हेरिएंटमुळे 1.55 लाखांपर्यंतची बचत होते. एंट्री-लेव्हल स्मार्ट प्लस डिझेल व्हेरिएंट देखील 99,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. इतर सर्व डिझेल व्हेरिएंटमध्ये देखील 1 लाख पेक्षा जास्त किमती कमी झाल्या आहेत.