अभिषेक ठाकूर करंडक क्रिकेट स्पर्धा (फोटो- सोशल मिडिया)
गतविजेता गेम चेंजर्स आणि उपविजेता व्ही-एड्ज यांच्यासह मुंडे स्पोर्ट्स (मुंबई), एडी स्पोर्ट्स (रत्नागिरी), नॉक-९९, एनबीसी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, एबी क्रिकेट क्लब, एमईएस क्लब, प्लॅटिनम क्रिकेट ॲकॅडमी, स्केल-अप अ आणि ब, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमी, हेमंत पाटील ॲकॅडमी, मॅव्हरीक्स, शशी पाटील इलेव्हन, ऑल स्टार, ब्रेव्हहार्ट क्लब, गॅलॅक्सी ड्रीमर्स आणि यजमान पुणे क्रिकेट ॲकॅडमी हे संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख रुपये आणि आकर्षक करंडक, तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये आणि करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठीही विविध पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू अशा पुरस्कारांनी गुणवंत खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारासह ‘फायटर ऑफ द मॅच’ पुरस्कारही दिला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सांघिक विजेतेपदाबरोबरच वैयक्तिक कामगिरीसाठीही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत
Ans: ‘अभिषेक ठाकूर करंडक’ क्रिकेट स्पर्धा येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर रंगणार आहे.
Ans: ‘अभिषेक ठाकूर करंडक’ स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत.






