Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata च्या ‘या’ व्हॅनचा सगळीकडेच बोलबाला ! एक-दोन नव्हे तर 20 जणं आरामात बसतील, किंमत 7 लाख रुपये

टाटाने विविध सेगमेंटमध्ये वाहनं ऑफर केली आहेत. पण आता टाटाच्या एका वाहनाचा सगळीकडेच बोलबाला पाहायला मिळत आहे. चला 20 सीटर Tata Winger बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 18, 2025 | 08:37 PM
फोटो सौजन्य: @flaneurUK (X.com)

फोटो सौजन्य: @flaneurUK (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे टाटा मोटर्सशिवाय अपूर्णच. टाटा मोटर्सने देशात विविध सेगमेंटमध्ये उत्तम आणि बेस्ट वाहनं ऑफर केली आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. पण कंपनीने पॅसेंजर व्हेईकल सोबतच कमर्शियल व्हेईकलमध्ये सुद्धा उत्तम वाहनं ऑफर करते. कंपनीच्या अशाच एका बेस्ट व्हॅनबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

फॅमिली ट्रिपसाठी बरेच लोकं 7 सीटर एसयूव्हीच्या शोधात असतात. अनेक जणांची कुटुंबे 7 लोकांपेक्षा मोठी असतात. अशा परिस्थितीत, संपूर्ण कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहते. जर तुम्हालाही संपूर्ण कुटुंबासह प्रवास करायचा असेल आणि तुमच्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन जायचे असेल, तर आज आपण अशा एका बेस्ट वाहनाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एका वेळी 20 जणं आरामात बसू शकतात. ज्याची किंमत फक्त 7 ते 7.50 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात एसी सुविधा देखील आहे. चला Tata Winger Van बद्दल जाणून घेऊयात.

40 हजारांच्या पगारात सुद्धा खरेदी करता येईल ‘या’ 5 धमाकेदार एसयूव्ही, अनेक उत्तम फीचर्सने असेल सुसज्ज

Tata Winger किंमत किती?

टाटाची ही 20 सीटर व्हॅन खूप स्वस्त आहे. या व्हॅनमध्ये तुम्हाला 20 जणांना एकत्र बसण्यासाठी जागा मिळते आणि त्यासोबतच तुम्हाला अनेक उत्तम सुविधाही मिळतात. टाटा विंगर व्हॅनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सुरुवातीची किंमत 7 लाख 20 हजार रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 7 लाख 56 हजार रुपयांपर्यंत जाते.

इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Royal Enfield ची एंट्री होणार ! ‘या’ महिन्यात लाँच होण्याची दाट शक्यता

इंजिन

Tata Winger मध्ये डिझेल इंजिन दिले आहे, जे त्याला प्रचंड पॉवर देते. आता Tata Winger देखील BS6 इंजिनसह येते, ज्यामुळे ही व्हॅन कमी प्रदूषण करते. या व्हॅनमध्ये 2.2 लिटर डायकोर इंजिन आहे, जे तिला उत्कृष्ट मायलेज आणि पॉवर देते.

या व्हॅनमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक, एबीएस सिस्टम, 5 गिअर बॉक्स दिले आहेत, जे या व्हॅनला उत्तम स्पीड आणि मायलेज देतात. जर तुमची टूर आणि ट्रॅव्हल एजन्सी असेल किंवा तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्ही त्यानुसार व्हॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata Winger तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते.

Web Title: Tata winger van price starts from 7 lakhs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 08:37 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motor

संबंधित बातम्या

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव
1

Yamaha कडून 125cc Fi Hybrid स्कूटर मोठे अपडेट, ग्राहकांना मिळणार एक नवा अनुभव

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत
3

वाह क्या बात ! ‘ही’ कंपनी ADAS फिचर असणारी पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत

15 ऑगस्ट महिंद्राने गाजवला, एक-दोन नव्हे तर 4 SUV कॉन्सेप्ट केल्यात सादर
4

15 ऑगस्ट महिंद्राने गाजवला, एक-दोन नव्हे तर 4 SUV कॉन्सेप्ट केल्यात सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.