Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय ग्राहकांसाठी VinFast आणणार 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; पुढील वर्षी होणार लाँच! जाणून घ्या

व्हिनफास्ट भारतात 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. Evo, Kyo आणि Kinet या मॉडेल्समध्ये 3kWh बॅटरीपासून 5.2kW मोटरपर्यंत वेगवेगळी वैशिष्ट्ये मिळतात. भारतीय रस्त्यांसाठी खास बदल करून येणाऱ्या या स्कूटर्स टीव्हीएस आणि बजाजला किती आव्हान देणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 18, 2026 | 04:11 PM
VinFast Three New Electric Scooters Launching In India (फोटो सौजन्य-AI एआय)

VinFast Three New Electric Scooters Launching In India (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • व्हिनफास्ट पुढील वर्षी भारतात Evo, Kyo आणि Kinet या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करणार आहे.
  • Kinet मध्ये 5.2kW मोटर असून 90kmph टॉप स्पीड आणि 145km रेंज मिळते.
  • तिन्ही स्कूटर्स भारतीय रस्त्यांसाठी बदलून तयार केल्या जाणार असून त्यांचे प्रोडक्शन भारतात होणार आहे.

व्हिएतनामची इलेक्ट्रिक वाहन कंपनी व्हिनफास्ट भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये मोठी एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनी पुढील वर्षी भारतात 3 नवीन VinFast Electric Scooters लाँच करणार आहे. यामध्ये VinFast Evo, Kyo आणि Kinet या मॉडेल्सचा समावेश आहे. या स्कूटर्सच्या भारतीय मॉडेलमध्ये डिझाइन, चेसिस आणि फीचर्समध्ये बदल केले जाणार आहेत. त्यामुळे VinFast Electric Scooters India Launch नंतर टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक आणि एथरच्या स्कूटर्ससमोर नवी स्पर्धा निर्माण होऊ शकते.

भारतीय रस्त्यांसाठी खास बदल

व्हिनफास्टच्या या तिन्ही स्कूटर्स व्हिएतनाममधील मॉडेल्सवर आधारित असतील. पण भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांची चेसिस आणि डिझाइन बदलण्यात येणार आहे. ग्राउंड क्लीअरन्स जास्त ठेवण्यासोबत सीटखालील स्टोरेज स्पेसही वाढवली जाण्याची शक्यता आहे. तिन्ही स्कूटर्समध्ये हब-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर मिळेल. त्यांची नावेही भारतीय मार्केटमध्ये बदलली जाऊ शकतात. विशेष म्हणजे या स्कूटर्सचे प्रोडक्शन भारतातच केले जाणार आहे.

स्कूटरमध्ये कारसारखी सेफ्टी! Ultraviolette Tesseract Maxi मध्ये रडार टेक्नोलॉजीसह 20 hp पॉवर; EICMA 2026 मध्ये सादर

व्हिनफास्ट Evo ठरणार सर्वात स्वस्त स्कूटर

व्हिएतनाममध्ये VinFast Evo ही तिन्ही मॉडेल्समधील परवडणारी स्कूटर आहे. यात 1.5kWh ची इनबिल्ट LFP बॅटरी आणि जास्त 1.5kWh ची रिमूव्हेबल बॅटरी लावण्याचा ऑप्शन मिळतो. दोन्ही बॅटरीसह तिची एकूण कॅपसिटी 3kWh होते. मोटर 2.45kW पॉवर देते. तिचा टॉप स्पीड 70kmph असून कंपनीच्या दाव्यानुसार रेंज 165km आहे. यात LCD स्क्रीन, फ्रंट डिस्क ब्रेक आणि 12-इंच व्हील्स मिळतात.

Kyo आणि Kinet मध्ये जास्त पॉवर

VinFast Kyo मध्ये 3kW हब मोटर असून तिची रेंज 160km आहे. यात 14-इंच व्हील्स, TFT डिस्प्ले, कीलेस फंक्शन आणि हिल होल्ड मिळते. सीटखाली 21 लिटर स्टोरेज आहे.

एथर इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री 3 लाखांच्या पार! 2026 मध्ये 67% वाढ, मार्केट शेअरही विक्रमी पातळीवर

दुसरीकडे, VinFast Kinet ही स्पोर्टी स्कूटर आहे. यात 5.2kW मोटर असून टॉप स्पीड 90kmph आहे. 0 ते 50kmph वेग गाठण्यासाठी तिला 6 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो. तिची रेंज 145km असून 22 लिटर स्टोरेज मिळते.

TVS, बजाज आणि एथरला मिळणार आव्हान

व्हिएतनाममध्ये Evo ची सुरुवातीची किंमत सुमारे ₹68,349, Kyo ची ₹1.09 लाख आणि Kinet ची ₹1.45 लाख आहे. पण भारतातील किमती वेगळ्या असू शकतात. भारतीय मॉडेलच्या बॅटरी कॅपसिटी आणि फीचर्सची माहिती कंपनीने अजून दिलेली नाही. पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या स्कूटर्समुळे भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये स्पर्धा आणखी वाढू शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: व्हिनफास्टच्या कोणत्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात लाँच होणार आहेत?

    Ans: व्हिनफास्ट भारतात Evo, Kyo आणि Kinet या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्कूटर्स व्हिएतनाममधील मॉडेल्सवर आधारित असतील, पण भारतीय रस्त्यांसाठी त्यात बदल केले जातील.

  • Que: व्हिनफास्ट Kinet इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड किती आहे?

    Ans: व्हिएतनाममधील Kinet मॉडेलमध्ये 5.2kW हब-माउंटेड मोटर देण्यात आली आहे. तिचा टॉप स्पीड 90kmph असून कंपनीच्या दाव्यानुसार रेंज 145km आहे.

  • Que: व्हिनफास्टच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात कधी लाँच होणार आहेत?

    Ans: कंपनीच्या माहितीनुसार, या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स 2027 मध्ये भारतीय मार्केटमध्ये लाँच होणार आहेत. त्यांचे प्रोडक्शन भारतातच केले जाणार आहे. भारतीय मॉडेल्सची किंमत आणि संपूर्ण फीचर्सची माहिती लाँचच्या वेळी समोर येईल.

Web Title: Vinfast electric scooters india launch evo kyo kinet 2027 auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

मारुती 800 चा जगभर डंका! पहिल्यांदाच भारतीय कारला मिळाला FIVA चा ऐतिहासिक सन्मान!
1

मारुती 800 चा जगभर डंका! पहिल्यांदाच भारतीय कारला मिळाला FIVA चा ऐतिहासिक सन्मान!

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण
2

महिंद्रा XEV 9S ची BNCAP क्रॅश टेस्टमध्ये बाजी! 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह मिळवले 31.15 गुण

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर
3

व्हिनफास्ट VF5 फेसलिफ्ट भारतात येणार! 370Km रेंजसह टाटा नेक्सॉन EV ला देणार टक्कर

कार छोटी, नखरे मोठे! MINI Cooper SE आणि Paul Smith Edition ची भारतात बुकिंग सुरू; 3 मॉडेल्समध्ये मिळणार खास डिझाइन
4

कार छोटी, नखरे मोठे! MINI Cooper SE आणि Paul Smith Edition ची भारतात बुकिंग सुरू; 3 मॉडेल्समध्ये मिळणार खास डिझाइन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.