फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असणे, हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. पण अनेकदा जास्त किंमत आणि कमी पगारामुळे हे स्वप्न पूर्ण होण्यास विलंब होतो. पण जर तुमचा पगार 35,000 ते 40,000 रुपये असेल आणि तुम्ही आधीच कोणतेही मोठे कर्ज घेतलेले नसेल, तर तुम्ही एक उत्तम एसयूव्ही देखील आरामात खरेदी करू शकता.
आवाज आपण 5 सर्वात परवडणाऱ्या, फीचर्सपूर्ण आणि सुरक्षित एसयूव्हींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही 6 ते 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत आरामात खरेदी करू शकता.
टाटा पंच ही भारतीय मार्केटमधील सर्वात किफायतशीर आणि सुरक्षित एसयूव्ही मानली जाते. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. यात 1.0 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे सीएनजी पर्यायात देखील उपलब्ध आहे. सीएनजी व्हेरियंटचा दावा केलेला मायलेज 26.99 किमी/किलो आहे.
Tata Motors पुन्हा एकदा नवीन EV मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज
टाटा पंचमध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, 10.25 -इंच टचस्क्रीन, वायरलेस फोन चार्जर, ड्युअल एअरबॅग्ज आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर सारखी आवश्यक फीचर्स आहेत. 5-स्टार ग्लोबल एनसीएपी रेटिंगसह, ही एसयूव्ही पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे. त्याचा टॉप व्हेरियंट 9.57 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.
या एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.14 लाख रुपये आहे. हे दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे (1.0 -लिटर नॅचरली एस्पिरेटेड आणि 1.0 -लिटर टर्बो पेट्रोल युनिट). कंपनीच्या मते या एसयूव्हीचा मायलेज 19.9 किमी प्रति लिटर आहे. यामध्ये मल्टी-कलर ॲम्बियंट लाइटिंग, 7-इंच डिजिटल डिस्प्ले, वायरलेस चार्जर, स्टँडर्ड 6 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा, व्हीडीसी, ईएससी आणि टीपीएमएस सारखे फीचर्स देण्यात आली आहेत.
Tata Safari Dark Edition क्षणार्धात होईल तुमची ! फक्त असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही एक अत्यंत आधुनिक आणि परवडणारी एसयूव्ही आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 7.54 लाख रुपये आहे. हे 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. यासोबत एक सीएनजी व्हेरियंट देखील उपलब्ध आहे, ज्याचा दावा केलेला मायलेज 28.51 किमी/किलो आहे.
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 9-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो क्लायमेट कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, ABS, EBD आणि 360 डिग्री कॅमेरा अशी फीचर्स आहेत. ही एसयूव्ही अशा ग्राहकांसाठी सर्वोत्तम आहे ज्यांना चांगले मायलेज तसेच आधुनिक तंत्रज्ञान हवे आहे.
स्कोडाची Kylaq SUV नुकतीच भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे आणि तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 8.25 लाख रुपये आहे. यात 1.0 -लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 19.68 किमी प्रति लिटर पर्यंतचा दावा केलेला मायलेज देते. या एसयूव्हीमध्ये 10.1 -इंच टचस्क्रीन, 8-इंच डिजिटल क्लस्टर, सिंगल-पॅन सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, 6 एअरबॅग्ज, टीपीएमएस आणि 25 हून अधिक सेफ्टी फीचर्स आहेत.
किया सायरोस ही भारतीय मार्केटमध्ये काही महिन्यांपूर्वीच लाँच झाली होती, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये आहे. हे दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे – 1.0 लिटर पेट्रोल आणि 1.4 लिटर डिझेल इंजिन. कंपनीच्या मते या एसयूव्हीचा मायलेज 20.75 किमी प्रति लिटर आहे.
या एसयूव्हीमध्ये 12.3 -इंच ड्युअल-स्क्रीन सेटअप, ड्युअल-झोन एसी, 4-वे पॉवर्ड ड्रायव्हर सीट, अँबियंट लाइटिंग, वायरलेस चार्जर, 6 एअरबॅग्ज, लेव्हल-2 एडीएएस आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी हाय-टेक फीचर्स आहेत.