फोटो सौजन्य: Social Media
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर या दुचाकी उतपादक कंपनीने देशात अनेक जबरदस्त बाईक्स ऑफर केल्या आहेत. आता कंपनी आपल्या आगामी बाईकच्या लाँचिंगवर लक्षकेंद्रित करत आहे. जानेवारीत आयोजित करण्यात आलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 या बाईक्स लाँच होणार आहे. पण या बाईक्सचे नाव काय आहे? एवढी चर्चा या बाईक्सबद्दल का होत आहे? चला याबद्दल जाणून घेऊया.
Mahindra XEV 7e टेस्टिंग दरम्यान झाली स्पॉट, ‘या’ खास गोष्टींची मिळाली माहिती
होंडा कंपनी आता भारतीय बाजारपेठेत त्यांच्या मध्यम-वजनाच्या बाईक्स लाँच करून त्यांच्या बिगविंग लाइनअपचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. एका टीझरप्रमाणे जपानी ऑटोमेकर CB650R सोबत भारतीय बाजारात त्यांची लोकप्रिय फुली-फेयर्ड CBR650R आणणार आहे. शिवाय, होंडा कंपनी येत्या 17 जानेवारीला नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी एक्स्पो 2025 मध्ये दोन्ही बाईक्स लाँच करण्याची शक्यता आहे. चला या दोन्ही बाईक्सच्या डिझाइनबद्दल जाणून घेऊया.
भारतीय बाजारपेठेत Honda CB650R पुन्हा लाँच करण्याची रणनीती कंपनीसाठी महत्वाचे आहे. कारण ही बाईक भारतीय बाजारपेठेत एक लोकप्रिय मॉडेल आहे. ही बाईक आकर्षक डिझाइनसह ट्विन हेडलॅम्प सेटअप आणि भन्नाट ग्राफिक्ससह येईल. ही बाईक रायडींसाठी एक उत्तम पर्याय असणार आहे. यासह, या बाईकमध्ये अतिरिक्त फीचर्स पाहायला मिळतील.
होंडा CB650R ला 2024 मध्ये अपडेटेड व्हर्जन भारतीय बाजारात सादर झाले होते. या बाईकमध्ये एक नेकेड डिझाइन आहे जे गोल हेडलॅम्पने पूरक आहे. उत्तम रायडींगसाठी या बाईकमध्ये एक सुशोभित इंधन टाकी आणि किंचित उंचावलेल्या हँडलबारसह रायडरला आरामदायी प्रवास देण्यासाठी डिझाइन आहे.
दोन्ही बाईक्समध्ये ४१ मिमी शोवा सेपरेट फंक्शन बिग पिस्टन फोर्क्सचा वापर करून त्यांचे हार्डवेअर शेअर केले आहे तर मागील बाजूस १०-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. ब्रेकिंगसाठी समोरील बाजूस ३१० मिमी डिस्क आणि मागील बाजूस २४० मिमी डिस्कची आहे. ब्रेकमध्ये स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमसह ड्युअल-चॅनेल एबीएस देखील आहे.
वाह रे चायनीज टेक्नॉलॉजी ! आता रस्त्यावरचा खड्डा दिसला की BYD ची ‘ही’ कार मारेल चक्क उडी
होंडा CBR650R आणि CB650R मध्ये 649 cc लिक्विड-कूल्ड इन-लाइन फोर-सिलेंडर इंजिन असणार आहे. हे युनिट 12,000 rpm वर 95 bhp पॉवर आणि 9,500 rpm वर रिव्ह्यू करताना 63 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यासाठी ट्यून केलेले आहे. हे युनिट नवीन ई-क्लच ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. ब्रँड 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देखील देते.
या दोन्ही बाईकमधील इंजिन 649 cc चे असल्यामुळे या बाईक दमदार परफॉर्मन्स देणार यात काही वाद नाही. म्हणूनच आता अनेक बाईकप्रेमींचे लक्ष या दोन्ही बाईकच्या लाँचिंगकडे असणार आहे.