फोटो सौजन्य: Social Media
देशाची बेस्ट एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्राने आतापर्यंत ग्राहकांसाठी हाय परफॉर्मन्स वाहनं उत्पादित केली आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाकडे लक्षकेंद्रित करत आहे. नुकतेच कंपनीने Mahindra BE 6 आणि XEV 9E भारतीय बाजारात लाँच केले होते. या दोन्ही कारच्या लूककडे जर आपण पहिले तर कंपनीने त्याचे लूक फ्यूचरिस्टिक ठेवले आहे. तसेच या दोन्ही कारची रेंज सुद्धा चांगली आहे. या दोन्ही कारला भारतीय ग्राहकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. आता कंपनी अजून एक जबरदस्त इलेक्ट्रिक एसयूव्ही मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे.
सध्या महिंद्रा त्यांच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओचा विस्तार करण्यात गुंतलेली आहे. त्याचवेळी, आता कंपनी महिंद्रा XEV 7e आणण्याची तयारी करत आहे. ही कार अलीकडेच टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. त्याच्या टेस्टिंग मॉडेलमध्ये डिझाइनपासून ते इंटीरियरपर्यंतचे तपशील पाहता येतात. चला या नवीन कारच्या फीचर्सबद्दल माहिती घेऊया.
Yamaha च्या ‘या’ बाईकला मिळणार हायब्रीड पॉवर, Bharat Mobility Global Expo मध्ये होणार लाँच
रुसलेनच्या अहवालानुसार, XUV700 चे इलेक्ट्रिक व्हर्जन XUV.e8 म्हणून सादर करण्यात आले आहे. त्याच वेळी, अलीकडील EV आणि ट्रेडमार्क फाइलिंग नावांनुसार, XUV700 च्या इलेक्ट्रिक व्हर्जनला XEV 7e म्हटले जाऊ शकते. अलीकडेच त्याची प्रोडक्शन व्हर्जन एका लीक झालेल्या व्हिडिओमध्ये दिसले आहे.
यात XEV 9e प्रमाणे त्रिकोणी हेडलॅम्प हाऊसिंग आहे. त्यात उलटे एल-आकाराचे डीआरएल दिसतात. तसेच एक नवीन बंपर सेक्शन आहे, जो 9e पेक्षा अधिक मजबूत दिसतो. या कारचा पुढचा भाग ICE XUV700 सारखा दिसतो. नवीन अलॉय व्हील डिझाइनसह या कारची साइड प्रोफाइल वेगळी दिसते.
वाह रे चायनीज टेक्नॉलॉजी ! आता रस्त्यावरचा खड्डा दिसला की BYD ची ‘ही’ कार मारेल चक्क उडी
XEV 7e मध्ये त्याच्या ICE व्हर्जनप्रमाणे 3-रो सीटिंग असेल. कॅप्टन सीट त्याच्या दुसऱ्या रांगेत आढळू शकते. यामध्ये, अॅम्बियंट लाइटिंग, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेदरेट अपहोल्स्ट्री सारखे प्रीमियम फीचर्स पाहता येईल.
याशिवाय, या कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, मेमरी फंक्शनसह इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल सीट्स आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम असू शकते. XEV 7e मध्ये तीन-स्क्रीन सेटअप असण्याची अपेक्षा आहे.
XEV 7e च्या पॉवरट्रेनची माहिती अद्याप मिळालेली नाही, परंतु आशा आहे की या कारमध्ये BE 6 आणि XEV 9e चे बॅटरी पॅक पाहायला मिळतील. पॅक वन व्हेरियंटमध्ये 59-kWh बॅटरी पॅक आणि पॅक थ्री व्हेरियंटमध्ये 79-kWh युनिट दिले जाऊ शकते. अपेक्षा आहे की ही कार सुमारे 650 किमीच्या रेंजसह येईल.
XEV 7e च्या लाँचिंगची अधिकृत वेळ अद्याप समोर आलेली नाही, परंतु ती 2025 च्या अखेरीस भारतात लाँच केली जाऊ शकते. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 21 लाख रुपये असू शकते.