Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thar EV ला तगडी फाईट! भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री; काय आहेत फीचर्स?

भारतात इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये चिनी ब्रँड Chery ची दमदार एन्ट्री होण्याची शक्यता आहे. कंपनीची Chery iCar V23 वर आधारित इलेक्ट्रिक SUV पुण्यातील ARAI जवळ टेस्टिंगदरम्यान दिसली आहे त्यामुळे उत्सुकता लागली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 24, 2026 | 01:51 PM
electric suv

electric suv

Follow Us
Follow Us:
  • भारतात नवीन इलेक्ट्रिक SUV ची एन्ट्री?
  • SUV कारमध्ये काय आहेत फीचर्स?
  • SUV कार भारतात कधी होणार लॉन्च?
Electric Vehicle : भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लवकरच एक जबरदस्त एन्ट्री होणार आहे. चिनी ऑटो दिग्गज ‘चेरी’च्या Chery iCar V23 वर आधारित एका दमदार इलेक्ट्रिक SUV ला पहिल्यांदाच भारतात टेस्टिंग दरम्यान पाहिलं गेलं आहे. रिपोर्ट्सनुसार, पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (ARAI) जवळ ही गाडी पूर्णपणे कॅमफ्लाज कव्हरमध्ये दिसली. जेव्हा एखादी गाडी ARAI जवळ टेस्टिंग करताना दिसते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या गाडीची होमोलोकेशन आणि सर्टिफिकेशन प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात लॉन्च होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल मानलं जातं आहे. ही बातमी अधिक महत्त्वाची ठरते कारण, चेरीने भारताच्या JSW ग्रुपसोबत हातमिळवणी केली आहे.

Electric Cars : 500 किमी रेंजसह जास्त जागा अन् कमी किंमत! ‘या’ आहेत भारतातील लक्झरी 7-सीटर इलेक्ट्रिक कार

दमदार लूक आणि मस्कुलर डिझाइन

ही SUV दिसायला अत्यंत ‘बॉक्सी’ आणि राकट आहे. यात गोलाकार हेडलाईट्स आणि क्लोज्ड फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे. आकारमानाचा विचार केला तर ही गाडी4220 मिमी लांब असून तिला 210 मिमीचा शानदार ग्राऊंड क्लीयरन्स मिळतो. या कारचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मागच्या बाजूला दिलेला बॉक्सी एक्सटर्नल स्टोरेज बॉक्स, जो स्पेयर व्हीलच्या जागी देण्यात आला आहे. याच्या मस्कुलर बनावटीमुळे आणि उंचीमुळे ही कार आगामी महिंद्रा थार EV समोर मोठे आव्हान उभे करेल, असे दिसून येत आहे.

लक्झरी केबिन आणि हाय-टेक फीचर्स

कारचे इंटीरियर अतिशय मॉडर्न आणि प्रीमियम फील देणारे आहे.

डिस्प्ले: डॅशबोर्डवर 15.4 इंचाची मोठी टचस्क्रीन आहे, जी ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते.

कंट्रोल्स: विशेष म्हणजे यात टचस्क्रीनसोबत फिजिकल बटन्सची सोयही आहे, ज्यामुळे ड्रायव्हिंग करताना क्लायमेट कंट्रोल आणि ऑडिओ सेटिंग्स सहज मॅनेज करता येतील.

सुरक्षा: सुरक्षिततेसाठी यात ADAS, 540-डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम  सारखे प्रगत फीचर्स दिले आहेत.

एका चार्जवर 500 किमी पेक्षा जास्त रेंज

चिनी मॉडेलच्या आधारावर पाहिले तर, भारतात येणाऱ्या या SUV मध्ये दोन बॅटरी पॅकचे पर्याय मिळू शकतात:

59.93 kWh बॅटरी: जी साधारण 401 किमी पर्यंतची रेंज देईल. 81.76  kWh बॅटरी: जी एका चार्जवर 510 किमी धावण्याचा दावा करते.

यात ‘रिअर-व्हील ड्राइव्ह’ (RWD) आणि ‘ऑल-व्हील ड्राइव्ह’ (AWD) असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंट अवघ्या7.5 सेकंदात  0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते.

भारतात कधी होणार लाँच?

‘Rushlane’ ने दिलेल्या माहितीनुसार, JSW मोटर्सला चीनकडून पार्ट्स आयात करण्यासाठी काही नियामक अडचणींचा सामना करावा लागत आहे.2020च्या नियमांनुसार, परदेशी सप्लायर्सना भारतात सामान पाठवण्यासाठी स्थानिक सर्टिफिकेशन आवश्यक असतं, ज्यासाठी बराच वेळ लागतो. JSW ग्रुप या प्रोजेक्टवर 27000 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. आता ही गाडी भारतीय शोरूम्समध्ये कधी येते आणि रस्त्यावर किती धुमाकूळ घालते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

Web Title: Thar ev rival cherry electric suv testing in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • automobile news
  • best suv cars
  • Electric Cars
  • Mahindra Thar Roxx
  • SUV
  • SUV cars

संबंधित बातम्या

Hyundai SUV: ह्युंडाई लाँच करणार ४ नवीन एसयूव्ही! पुढील वर्षभरात होणार मार्केटमध्ये दाखल
1

Hyundai SUV: ह्युंडाई लाँच करणार ४ नवीन एसयूव्ही! पुढील वर्षभरात होणार मार्केटमध्ये दाखल

Car Insurance Tips: मुसळधार पावसात झाड पडून कारचे नुकसान झाल्यास अशा पद्धतीने करा विम्यासाठी दावा
2

Car Insurance Tips: मुसळधार पावसात झाड पडून कारचे नुकसान झाल्यास अशा पद्धतीने करा विम्यासाठी दावा

ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा या महत्वपूर्ण गोष्टी! अन्यथा नंतर होईल पश्चाताप, जाणून घ्या फायदे आणि तोटे
3

ऑटोमॅटिक कार खरेदी करण्यापूर्वी नक्की वाचा या महत्वपूर्ण गोष्टी! अन्यथा नंतर होईल पश्चाताप, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक
4

Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.