फोटो सौजन्य: Pinterest
दक्षिण कोरियन वाहन निर्माता Hyundai Motor Company कडून मिड-साईज एसयूव्ही Hyundai Creta N Line ही स्पोर्टी व्हर्जनमध्ये ऑफर केली जाते. जर तुम्ही ही एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. चला जाणून घेऊयात, 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर दरमहा तुम्हाला किती EMI भरावा लागेल?
हुंडईकडून क्रेटा N Line च्या बेस व्हेरिएंट N8 ची एक्स-शोरूम किंमत 17.83 लाख रुपये आहे. ही कार खरेदी केल्यास एक्स-शोरूम किंमतीसोबत नोंदणी शुल्क, विमा आणि इतर शुल्क भरावे लागतात. अंदाजे 1.78 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स, सुमारे 78 हजार रुपये विमा आणि जवळपास 18 हजार रुपये टीसीएस शुल्क भरावे लागते. त्यामुळे या एसयूव्हीची ऑन-रोड किंमत सुमारे 20.57 लाख रुपये होते.
Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?
बँक साधारणपणे एक्स-शोरूम किंमतीवर कर्ज मंजूर करते. जर तुम्ही 3 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले, तर सुमारे 17.57 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. हे कर्ज 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी घेतल्यास दरमहा सुमारे 28,277 रुपयांचे ईएमआय भरावे लागेल.
जर 9 टक्के व्याजदराने 17.57 लाख रुपयांचे सात वर्षांसाठी कर्ज घेतले, तर सात वर्षांत तुम्ही जवळपास 6.17 लाख रुपये व्याज म्हणून भराल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज यांचा एकूण विचार केला तर या कारची किंमत सुमारे 26.75 लाख रुपयांपर्यंत जाईल.
मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये क्रेटा N Line चे थेट स्पर्धक म्हणून Toyota Urban Cruiser Hyryder MG Hector, Maruti Grand Vitara आणि Mahindra Scorpio यांचा समावेश होतो. जर तुम्हाला स्पोर्टी लुक, दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम फीचर्स असलेली एसयूव्ही हवी असेल, तर क्रेटा N Line एक आकर्षक पर्याय ठरू शकते.






