फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतात ज्याप्रमाणे दमदार कार्स लाँच होत आहे, त्याचप्रमाणे आकर्षित डिझाईन असणाऱ्या बाईक्ससुद्धा मार्केटमध्ये दाखल होत आहे. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या आपल्या बाईक्सकडून असणाऱ्या अपेक्षा सुद्धा बदलत आहे. यातीलच सर्वात मोठी अपेक्षा म्हणजे कमी किंमतीत चांगली परफॉर्मन्स असणारी बाईक मिळावी.
भारत अनेक कंपनीज आहेत ज्या बाइकस्वारांसाठी उत्तमोत्तम बाईक्स मार्केटमध्ये आणत असतात. यातील एक कंपनी म्हणजे हिरो मोटोरकॉर्प. या कंपनीच्या अनेक बाईक्स सध्या भारतीय मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहे.कंपनीने नुकतेच भारतीय बाजारात नवीन बाईकचे मॉडेल सादर केले आहे.
हे देखील वाचा: बाईकचा गिअर बदलताना क्लच अर्धा दाबावा की पूर्ण? जाणून घ्या योग्य पद्धत
कंपनीकडून मध्ये केलेले बदल आता Xtreme 160R 2V मध्ये देखील लागू करण्यात आले आहेत. या नवीन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 1.11 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा सुमारे 10 हजार रुपये कमी आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते.
Hero ने भारतीय बाजारात Xtreme 160R 2V लाँच केली आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत या नवीन बाईकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या बाईकच्या मागील बाजूस ड्रम ब्रेकचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच सिंगल-चॅनल एबीएसही बसवण्यात आले आहे. ही बाईक सिंगल-पीस सीटसह येते. या सीटची उंची मागील मॉडेलच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे.
Hero Xtreme 160R 2V ला आता 4V मधून नवीन आणि प्रगत फीचर्स मिळाली आहेत. यामध्ये नवीन डिझाईन, अपडेटेड टेल-लाइट आणि उत्तम तांत्रिक फीचर्स समाविष्ट आहेत. हिरो बाईकचे हे मॉडेल फक्त ब्लॅक कलरमध्ये येते. या बाईकमध्ये नवीन टेललाइटचा वापर करण्यात आला आहे.
हिरोचा दावा आहे की ही बाईक 4.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते. या बाईकचे नवीन व्हर्जन स्टेल्थ ब्लॅक कलरमध्ये आणण्यात आले आहे. ही बाईक फक्त सिंगल ब्रेक व्हेरियंटसह येते. या बाईकच्या फ्रंट ब्रेकमध्ये डिस्क 276 मिमी पेटलचा वापर करण्यात आला आहे. तर मागील ब्रेकमध्ये डिस्क 220 मिमी आणि पेटल ड्रम 130 मिमी वापरण्यात आली आहे.
या नवीन बाईकच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाही. या नव्या बाईकचे इंजिन आधीच्या मॉडेलप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. हीरो बाईकमध्ये एअर-कूल्ड, 163.2cc, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 8,500rpm वर 15hp पॉवर देते आणि 6,500rpm वर 14Nm टॉर्क जनरेट करते.