हैदराबाद गॅझेटवरून काढलेल्या जीआर विरोधात हायकोर्टात तीन याचिका दाखल झाल्या आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे काल रात्री उशिरा अहिल्यानगर शहरात कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ओबीसी समाजाचे कुठले आरक्षण कमी होऊ नये ही दक्षता घेऊन जीआर काढण्यात आला असल्याचं त्यांनी म्हटले आहे. जर काही शंका असेल तर समितीचे अध्यक्ष विखे पाटील शंका दूर करतील, तसेच वेळ पडल्यास दोन्ही समितीचे अध्यक्ष एकत्र चर्चा करून शंका दूर करू शकतात असं सामान त्यांनी म्हटल आहे. तसेच ओबीसींवर अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.