फोटो सौजन्य- pinterest
पितृपक्षातील नवमी तिथीला विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी कोणत्याही महिन्याच्या नवमी तिथीला मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे श्राद्ध केले जाते. यालाच अविधवा नवमी असे देखील म्हटले जाते. ही तिथी आईचे श्राद्ध करण्यासाठी देखील योग्य मानली जाते. असे म्हटले जाते की, या तिथीला श्राद्ध केल्याने कुटुंबातील मृत महिला सदस्यांच्या आत्म्याला शांती मिळते. नवमीचा दिवस त्या माता, बहिणी आणि मुलींना समर्पित आहे ज्यांचे पती जिवंत असताना निधन झाले किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते. पितृपक्षातील नवमी तिथी कधी आहे आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या
पितृपक्षात येणाऱ्या नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला मातृनवमी असे म्हटले जाते. यावेळी ही तिथी सोमवार, 15 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी ज्या माता, बहिणी आणि मुलींचे पती जिवंत असताना निधन झाले किंवा ज्यांची मृत्युतारीख माहीत नाही त्यांच्यासाठी हे श्राद्ध केले जाते. या तिथीला नवमी किंवा अविधवा नवमी असे देखील म्हणतात.
मातृ नवमीच्या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे कुटुंबातील मृत झालेल्या सदस्याच्या आत्म्याला शांती लाभते आणि ते प्रसन्न होतात, असे म्हटले जाते. या दिवशी केलेल्या श्राद्धामुळे वंश आणि कुलाची प्रगती होते, असे देखील म्हटले जाते. त्याचसोबत जी व्यक्ती हे श्राद्ध करते त्यांच्या जीवनामध्ये मातृत्व, स्नेह आणि आनंद कायम राहतो.
ज्यांचे आई वडील मृत पावले आहे त्यांचे श्राद्ध आणि तर्पण केले जाते.
ब्राह्मणांना भोजन द्या, विशेषतः ब्राह्मण पत्नीला दान द्या.
वृद्ध महिलांना भेटवस्तू देणेदेखील पुण्य मानले जाते.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि मातृशक्तीचे स्मरण करा.
गाय, कुत्रा, मासे, मुंग्या आणि कावळे यांना अन्न आणि पाणी अर्पण केले जाते. मान्यतेनुसार यामुळे पूर्वजांना अन्न मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते.
मातृ नवमीच्या दिवशी काही कामे करणे अनिवार्य मानली जातात.
कोणत्याही श्राद्धाच्या पूजेमध्ये तुळशीला विशेष महत्त्व असते. म्हणूनच मातृ नवमीच्या दिवशी तुळशीची देखील पूजा करावी.
यासोबतच पूर्वजांशी संबंधित कोणत्याही कामात तांब्याच्या भांड्यांचा वापर करा.
या काळात कोणत्याही महिलेचा अपमान करु नका. असे फक्त मातृ नवमीच्या दिवशीच नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनातही करा. असे केल्याने तुम्हाला शुभ फळे मिळतील.
मातृ नवमीच्या दिवशी शक्य असल्यास गरजू विवाहित महिलांना लाल साडी, बांगड्या इत्यादी सुहासिनीच्या वस्तूंचे दान करावे.
या दरम्यान तुमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला रिकाम्या हाताने पाठवू नका आणि त्यांना जेवण द्या.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)