भारतीय रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्यांचा बोलबाला वाढत असतानाच, फ्रेंच कार कंपनी सिट्रॉनने आपली नवी कोरी Citroen e-C3X इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारात उतरवली आहे. आकर्षक डिझाईन आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीत आलेली ही स्टायलिश कार सध्या ऑटोमोबाईल विश्वात धुमाकूळ घालत आहे.
दमदार फीचर्स आणि रॅडिकल लुक
सिट्रॉन e-C3X चा SUV अवतार एकदम युनिक आणि बोल्ड आहे. यात नवीन LED प्रोजेक्टर हेडलाइट्स, स्प्लिट LED DRLs आणि १५-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारच्या आत डोकावल्यास, ‘इलेक्ट्रिक ब्लू’ थीमसह ड्युअल-टोन लेदरेट सीट्स आणि डॅशबोर्ड मिळतो. टेक-सॅव्ही लोकांसाठी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्ट करणारी १०.२५-इंच टचस्क्रीन आणि ७-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे. सुरक्षेसाठी यात ६ एअरबॅग्ज आणि वायरलेस चार्जरचा समावेश आहे.
बॅटरीचे खास वैशिष्ट्य आणि खरेदीचा भारी पर्याय (BaaS)
या कारमध्ये २९.२ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळतो, जो सिंगल चार्जमध्ये तब्बल ३२५ किमी (MIDC) ची उत्तम रेंज देतो. डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने ही बॅटरी अवघ्या ५७ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते. या गाडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे BaaS (Battery-as-a-Service) हा पर्याय! म्हणजे, ग्राहकांना गाडी खरेदी करताना बॅटरीची पूर्ण किंमत एकदम मोजावी लागणार नाही. ग्राहक बॅटरीशिवाय फक्त गाडी खरेदी करू शकतात आणि बॅटरी भाड्याने (रेंटवर) घेऊ शकतात. सिट्रॉनचा ‘स्मार्ट’ पॅक- BaaS पर्यायांतर्गत बॅटरीचे भाडे फक्त ₹२.२६ प्रति किमी एवढेच मोजावे लागेल!
ग्राहकांची होणार बंपर बचत
सिट्रॉनने या पर्यायाद्वारे भारतीय ग्राहकांसाठी ईव्ही खरेदी अतिशय परवडणारी केली आहे:
कमी किंमत: बॅटरीसह या कारची किंमत ₹१०.२५ लाख (ex-showroom) पासून सुरू होते. पण BaaS पर्याय निवडल्यास, गाडी फक्त ₹६.८९ लाखांत खरेदी करता येते. यामुळे सुरुवातीचा मोठा खर्च वाचतो.
परवडणारा रनिंग कॉस्ट: पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत या गाडीचा मेंटेनन्स खर्च अवघा १९ पैसे प्रति किमी येतो, ज्यामुळे महिन्याचा खिसा हलका होत नाही.
SUV Sale: आकर्षक डिस्काउंटमुळे प्रीमियम SUV खरेदी करण्याची उत्तम संधी, जाणून घ्या ऑफर
भारतीय रस्त्यांसाठी वरदानच जणू
भारतीय रस्त्यांवरील खड्डे आणि ट्रॅफिकचा विचार करून यात सिट्रॉनचे प्रसिद्ध Advanced Comfort Suspension दिले आहे, जे प्रवाशांना ‘फ्लाइंग कार्पेट’ प्रवास अनुभव देते. १७० मिमी चा उत्तम ग्राउंड क्लीअरन्स आणि ४.९८ मीटरचा लहान टर्निंग रेडिअस यामुळे ही कार गर्दीच्या शहरात आणि हायवेवर चालवणे अगदी सोपे जाते.
थोडक्यात सांगायचे तर, कमी बजेटमध्ये प्रीमियम आणि पर्यावरणपूरक SUV शोधणाऱ्या भारतीय कुटुंबांसाठी नवी सिट्रॉन e-C3X हा एक ‘पैसा वसूल’ आणि स्मार्ट पर्याय ठरतोय.






