टॉप ५ एसयूव्ही ज्या मिळतील १० लाखाच्या आत (फोटो सौजन्य - Social Media)
टाटा नेक्सॉन ही भारतीय ग्राहकांची पहिली पसंती झाली आहे. कारण सुरक्षितता आणि परफॉर्मन्स असे कमाल कॉम्बिनेशन ही गाडी देते. ५ स्टार सेफ्टी रेटिंगवाली ही कार आपल्या मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि स्टायलिश लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. १० लाखाच्या बजेटमध्ये याचा बेस आणि मिड-वेरिएंट सहज मिळतो. ज्यामध्ये तुम्हाला १.२ लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचे शक्तिशाली पर्यायदेखील उपलब्ध आहेत.
तुमची प्राथमिकता जर कमी मेटेंनन्स आणि मायलेज असेल तर मारुती सुझुकी ब्रेझा हे तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. यामध्ये १.५ लीटरचे मोठे के-सिरीज पेट्रोल इंजिन मिळते जे अत्यंत स्मूथ आणि रिफाईंड असा अनुभव तुम्हाला मिळवून देते. तसंच कुटुंबासाठी या गाडीत उत्तम केबिन स्पेस आणि रिअर सीट कम्फर्टदेखील देण्यात आले आहे. १० लाखाच्या आतमध्ये तुम्हाला ही कार उत्तम अनुभव मिळवून देते.
ह्युंदाई वेन्यू त्या व्यक्तींसाठी उत्तम पर्याय आहे जो एक कॉम्पॅक्ट आकारात प्रीमियम आणि आधुनिक फील मिळवून देतो. १.२ लीटर नैसर्गिक अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सिटी ड्रायव्हिंगसाठी अत्यंत आरामदायी आणि सायलंट परफॉर्म करणारी ही गाडी आहे. या कारमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टिम आणि कनेक्टिव्हिटी कार फिचर्स आपल्या सेगमेंटमध्ये वेगळी ओळख मिळवून देते.
किआ सोनेट बोल्ड आपल्या क्लासी लुक्स आणि स्पोर्टी इंटिरिअरमुळे तरूणांमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये वेन्यूमध्ये असणारे विश्वासाचे इंजिन पर्याय म्हणून उपलब्ध आहे. पण याचे बाहेरील डिझाईन खूपच आकर्षक दिसते. कारच्या आत देण्यात आलेले केबिन आणि डॅशबोर्ड सेटअप अत्यंत अग्रीम आणि हायटेक वाईब देणारे आहेत. तुम्हाला आधुनिक क्लासी लुक आवडत असेल तर ही कार उत्तम आहे.
महिंद्रा ही अत्यंत मोठी गाडी असून ग्राहकांना नेहमीच आकर्षित करते. यामुळे रिअर सीटवर तीन जण आरामात बसू शकतात. यामध्ये मिळणारे १.२ लीटर पेट्रोल टर्बो पेट्रोल इंजिन अत्यंत चांगले टॉर्क जनरेट करतात. १० लाख रुपये बजेटमध्ये महिंद्राचे सुरूवातीचे वेरिएंट सहजपणाने मिळू शकतात. तसंच यामध्ये सुरक्षिततेसाठी स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत.
गाडीची निवड करताना केवळ सुरुवातीच्या किंमतीवर लक्ष न देता त्याचे इन्शुरन्स, नोंदणी आणि मेंटेनन्स खर्चाचा हिशेब पहिल्यांदाच लाऊन घ्या. टर्बो पेट्रोल इंजिन तुम्हाला चांगले पिकअप देते. तुम्ही कुठली गाडी घेणार आहात नक्की ठरवा






