
फोटो सौजन्य: Pinterest
वेगाने वाढणाऱ्या भारतीय EV बाजारात Toyota ची ही मजबूत एंट्री मानली जात आहे. विशेष म्हणजे, Urban Cruiser BEV ही प्रत्यक्षात Maruti Suzuki e Vitara चीच बॅज-इंजिनिअर्ड आवृत्ती असेल. दोन्ही कार्सचे उत्पादन Suzuki च्या गुजरात प्लांटमध्ये केले जाईल. ही SUV नव्या Heartect-e platform वर आधारित असेल.
600 किमी रेंज देऊन सुद्धा ‘ही’ Electric Car ठरली फ्लॉप! 2025 मध्ये मिळाले फक्त 225 ग्राहक
Toyota Urban Cruiser BEV चा डिझाइन बराचसा Maruti e Vitara सारखा असेल, मात्र Toyota ची स्वतंत्र ओळख यात स्पष्टपणे दिसून येईल. SUV च्या फ्रंटला स्लिम LED headlamps देण्यात येतील, जे क्रोम स्ट्रिपने जोडलेले असतील. यामध्ये क्लोज्ड ग्रिल, व्हर्टिकल एअर व्हेंट्स आणि Toyota चा सिग्नेचर हॅमरहेड डिझाइन पाहायला मिळेल. साइड प्रोफाइलमध्ये बॉडी क्लॅडिंग आणि नव्या डिझाइनचे एअरो अलॉय व्हील्स यामुळे SUV ला स्पोर्टी लूक मिळेल. मागील बाजूस कनेक्टेड LED टेल लॅम्प्स देण्यात येतील, ज्यामुळे प्रीमियम अपील वाढेल. आकारमानाच्या दृष्टीने ही SUV लांब आणि रुंद असल्याने केबिनमध्ये अधिक जागा मिळेल.
Urban Cruiser BEV चे केबिन मॉडर्न डिझाइन आणि आरामावर केंद्रित असेल. यात dual-tone interior, लो-सेट डॅशबोर्ड आणि मोठा टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टिम दिला जाईल, जो वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कार प्ले सपोर्ट करेल. याशिवाय digital instrument cluster, नवीन मल्टि-फंक्शन स्टिअरिंग व्हील आणि एम्बिएन्ट लाइटइनिंग देखील मिळू शकते. कम्फर्टसाठी व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ आणि स्लायडिंग रिअर सीट्स यांसारखी फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे.
अहो आश्चर्य! 200 वर्षांपूर्वीच ‘या’ व्यक्तीने बनवली होती Electric Car, जाणून घ्या वैशिष्ट्य
Toyota Urban Cruiser BEV मध्ये 49 kWh आणि 61 kWh असे दोन बॅटरी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मोठ्या बॅटरीसह ही इलेक्ट्रिक SUV एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 500 ते 550 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. फीचर्सच्या बाबतीत, या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, वायरलेस चार्जिंग आणि प्रीमियम साउंड सिस्टीम देण्यात येण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्स, लेव्हल-2 ADAS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारखी प्रगत सेफ्टी फीचर्स मिळू शकतात.
Toyota Urban Cruiser BEV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत अंदाजे 20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही इलेक्ट्रिक SUV Hyundai Creta EV आणि Maruti e Vitara सारख्या मॉडेल्सना थेट स्पर्धा देईल.