
फोटो सौजन्य: Gemini
टीकेएमचे सेल्स, सर्व्हिस आणि युज्ड कार व्यवसायाचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा यांनी सांगितले की, “सरकारच्या प्रगतिशील जीएसटी सुधारणांमुळे आणि सकारात्मक सणासुदीच्या वातावरणामुळे विक्रीचा मजबूत वेग कायम आहे. अर्बन क्रूझर हायराइडर एयरो एडिशन आणि फॉर्च्यूनर लीडर एडिशनच्या अलीकडील लाँचला देशभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून त्याचा थेट फायदा विक्रीत दिसून येतो. तसेच ड्रम ताओसारख्या नवकल्पनात्मक उपक्रमांमुळे आणि बेंगळुरूमध्ये सुरू केलेल्या टोयोटा एक्सपीरिएन्शियल म्युझियम (टीईएम)मुळे आमचा ब्रँड कनेक्ट आणि ग्राहक सहभाग अधिक बळकट होत आहे.”
कंपनीने जपानमधील जागतिक कीर्तीप्राप्त परफॉर्मन्स ग्रुप आणि टोयोटाचे ब्रँड ॲम्बेसेडर ड्रम ताओ यांच्या १४ शहरांच्या भारत दौऱ्याचे आयोजन केले आहे. हे सादरीकरण इंडो-जपानी सांस्कृतिक उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असून चेन्नई, शिलाँग, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि जयपूर येथे प्रेक्षकांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. पुढील कार्यक्रम कोहिमा, गुवाहाटी, इंदूर, वाराणसी, मुंबई, पुणे, अंदमान आणि बेंगळुरू येथे आयोजित केले जातील. या सांस्कृतिक दौऱ्याची सांगता २१ डिसेंबर २०२५ रोजी बेंगळुरूमध्ये होईल. इच्छुक प्रेक्षकांना टीकेएमच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करता येईल.
याला म्हणतात विंटेज लूक! Harley-Davidson X440T झाली सादर, दमदार फीचर्सने सुसज्ज
२३ नोव्हेंबर २०२५ रोजी टीकेएमने टोयोटा एक्सपीरिएन्शियल म्युझियम (टीईएम)चे अनावरण केले. जपानी सौंदर्यदृष्टी आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा सुंदर मेळ साधणारे हे भारतातील पहिले मल्टी-सेंसरी लाइफस्टाइल आणि सांस्कृतिक केंद्र आहे. येथे तीन प्रमुख विभाग आहेत, इमर्सिव्ह एक्सपीरियन्स रूम्स, क्युरेटेड मर्चेंडाइज शॉप आणि खऱ्या जपानी माचा चहाचा अनुभव देणारे कॅफे.