फोटो सौजन्य: @AUTOTODAYMAG (X.com)
Harley-Davidson च्या बाईक्स तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचे पॉवरफुल परफॉर्मन्स आणि दमदार लूक. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय X440 बाईकचे एक नवीन आणि अधिक स्टायलिश व्हर्जन सादर केले आहे. हे नवीन व्हर्जन हार्ले-डेव्हिडसन X440T आहे. लवकरच ही बाईक भारतीय बाजारात लाँच केली जाईल.
‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या
या बाईकला पूर्वीपेक्षा अधिक स्पोर्टी आणि फ्रेश डिझाइन देण्यात आले आहे. कंपनीने प्रामुख्याने स्टायलिंगवर लक्षकेंद्रित केले आहे. हे एक प्रकारचे X440 चे फेसलिफ्ट व्हर्जन आहे, जे या बाईकची क्रेझ कायम ठेवण्यासाठी आणले आहे.
नवीन रिअर फेंडर, सिंगल-पीस सीट, एलईडी टेललाइट, नवीन एक्झॉस्ट हीट शील्ड, नवीन ग्राफिक्स आणि कलरवे आणि बार-एंड मिरर हे बदल X440T चे वजन X440 च्या 190.5 किलोपेक्षा थोडे कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
स्टाईलिंगमध्ये बदल असूनही, हार्ले-डेव्हिडसन X440T चा मेकॅनिकल सेटअप मोठ्या प्रमाणात X440 सारखाच आहे. फ्रेम आणि सस्पेंशनमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत. यात USD फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल रियर शॉक अॅब्झॉर्बर्स आहेत.
30-35 हजार पगारात Tata Harrier खरेदी करू शकतो का? Down Payment आणि EMI चा हिशोब एकदम सोपा
या बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत. यात ड्युअल-चॅनेल ABS देखील आहे. X440 प्रमाणे, यात 18-इंच फ्रंट आणि 17-इंच रिअर अलॉय व्हील्स आहेत.
Harley-Davidson X440T मध्ये तोच 440cc सिंगल-सिलेंडर, ऑयल-कूल्ड इंजिन देण्यात आला आहे. हे इंजिन 27 bhp ची पॉवर आणि 38 Nmचा टॉर्क निर्माण करते. या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्सची जोड देण्यात आली आहे.
Harley-Davidson X440T भारतात लवकरच लाँच होणार आहे. सध्या Harley-Davidson X440 ची एक्स-शोरूम किंमत 2.4 लाख रुपये ते 2.8 लाख रुपये दरम्यान आहे. X440T ची किंमतही याच श्रेणीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






