Triumphच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दसरा दिवाळी जवळ आली की सगळ्या कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमती कमी करतात किंवा नवीन ऑफर आणतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू होते. अशातच Triumph कंपनीने पण आपल्या चाहत्यांसाठी एक खुशखबर दिली आहे. Triumph ने आपल्या दोन सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या बाईकच्या किमती कमी केल्या आहेत. ज्या बाईकच्या किमती कमी झाल्या आहेत त्यांची नावं आहेत Triumph Speed 400 आणि Tracker 400. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच कंपनीने या बाईकच्या किमती वाढवल्या होत्या. आणि आता परत त्यांनी किमती कमी केल्या आहेत. या वर्षी जून महिन्यापासून कंपनीने तिसऱ्यांदा किमतीत बदल केला आहे.
कंपनीने एप्रिलमध्ये आपली 400 सीरीज लॉन्च केली होती. त्यावेळी Speed 400 ची किंमत 2.32 लाख होती आणि Tracker 400 ची किंमत 2.46 लाख होती. पण जुलैमध्ये कंपनीने किमती वाढवल्या. Speed 400 ची किंमत 2.40 लाख केली आणि Tracker 400 ची किंमत 2.49 लाख केली.आता सणाच्या तोंडावर कंपनीने परत किमती कमी केल्या आहेत. Speed 400 ची किंमत 6000 रुपयांनी कमी केली आहे. आधी ती 2.40 लाखाला होती.
टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
आता ती 2.34 लाख रुपयांना मिळेल. आणि Tracker 400 ची किंमत 7000 रुपयांनी कमी केली आहे. आधी 2.49 लाख होती, आता 2.42 लाख रुपयांना मिळेल. म्हणजे घ्यायचा विचार करत असाल तर आत्ताच बेस्ट टाइम आहे.बाकीच्या बाईकच्या किमतीत बदल नाही Triumph च्या सगळ्याच बाईक स्वस्त झाल्या नाहीत. फक्त या दोनच बाईकच्या किमती कमी झाल्या आहेत.
किमती कमी झाल्या म्हणजे बाईकमध्ये काही बदल केला आहे का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर उत्तर आहे नाही. इंजिन, फीचर्स सगळं जैसे थेच आहे. फक्त किमती कमी केल्या आहेत.
पण एक गोष्ट नवीन झाली आहे. Scrambler 400X जी स्वस्त झाली नाही, तिच्यात दोन नवीन रंग आणले आहेत. एक आहे Matt Pewter Grey आणि दुसरा आहे Matt Khaki Green. हे दोन्ही रंग दिसायला एकदम भारी आणि रफ अँड टफ दिसतात.
त्यामुळे जर तुम्ही 2 ते 2.5 लाखाच्या बजेटमध्ये एक भारी, स्टायलिश आणि दमदार बाईक शोधत असाल तर Triumph च्या या बाईक नक्की बघा. सणासुदीच्या काळात शोरूममध्ये अजून काही ऑफर पण मिळू शकते, त्यामुळे एकदा जाऊन चौकशी नक्की करा.






