Honda SP160 ची नवीन किंमत काय?
पूर्वी बाईक खरेदी करताना आपल्याला 28 टक्के GST द्यावा लागत होता. मात्र, आता नवीन जीएसटी सुधारणेनुसार आपल्याला 18 टक्के जीएसटी द्यावा लागत आहे. या जीएसटी कपातीमुळे बाईक खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होतेय. अशातच जर तुम्ही Honda SP160 बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
भारतीय बाजारात टू-व्हीलर्स खरेदी करणे आता पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही GST कपातीनंतर Honda SP160 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आपण जाणून घेऊयात की ही बाईक तुम्हाला आता किती किमतीत मिळू शकते.
GST कपातीनंतर Honda SP160 च्या एक्स-शोरूम किंमतीत 9,000 ते 10,635 पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे ही बाईक आता पूर्वीपेक्षा अधिक परवडणारी झाली आहे. यामुळे सणासुदीच्या हंगामात या बाईकच्या विक्रीला चांगला चालना मिळू शकतो.
अरे Maruti Suzuki Ertiga स्वस्त झाली रे! मिळणार पहिल्यापेक्षा जास्त फीचर्स, नवीन किंमत…
नवीन Honda SP160 मध्ये OBD2 मानक असलेले 162 cc प्रोग्राम्ड फ्युएल इंजेक्शन (PGM-FI) इंजिन दिले गेले आहे, जे 13.5 hp ची पॉवर आणि 14.6 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये वापरलेलासोलिनॉइड व्हॉल्व् इंजिन स्टार्ट आणि वॉर्मअप दरम्यान ऑटोमॅटिक चोक म्हणून काम करतो. कंपनीच्या मते, हे इग्निशन आणि इंजिन गरम असताना अधिक हवा देण्याचे काम करते.
याशिवाय, या बाईकमध्ये एक बटण दिले आहे, ज्याद्वारे सिग्नल किंवा थांबण्याच्या ठिकाणी इंजिन बंद करण्याची सुविधा आहे. तसेच इमर्जन्सी स्टॉप आणि खराब व्हिजिबिलिटी सारख्या परिस्थितीत फ्लॅशिंग इंडिकेटर लाइट सक्रिय करण्यासाठी एक स्वतंत्र स्विचही दिला आहे.
Thalapathy Vijay च्या ताफ्यात एकापेक्षा एक Luxury Cars चा समावेश, किंमत तर विचारूच नका
Honda SP160 ला स्पोर्टी लूक आणि अॅडव्हान्स फीचर्ससह डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणारी फीचर्स मिळतात. यामध्ये 4.2-इंच TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले आहे, ज्यामध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.
यात LED हेडलाइट आणि टेललाइट, सिंगल-चॅनल ABS, USB-C चार्जिंग पोर्ट, इंजिन स्टॉप स्विच आणि हॅझर्ड स्विच, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि रियर मोनोशॉक सस्पेंशन सारखी सोयी उपलब्ध आहेत.
बाजारात ही बाईक TVS Apache RTR 160 4V, TVS Raider आणि Pulsar N160 यांसारख्या बाईक्सना जोरदार टक्कर देते.