फोटो सौजन्य AI
बंकर रॉय यांचा जन्म १९४५ मध्ये झाला . उच्चभ्रू कुटुंबात वाढलेल्या बंकर रॉय यांनी प्रतिष्ठित शिक्षण घेतले होते . मात्र १९६० च्या दशकात बिहारमधील दुष्काळग्रस्त भागात काम करताना त्यांना ग्रामीण भारतातील गरिबी आणि सामाजिक विषमतेची जाणीव झाली . त्यानंतर त्यांनी पारंपरिक करिअरचा मार्ग सोडून ग्रामीण समुदायांपासून काम करण्याचा निर्णय घेतला . १९७२ मध्ये राजस्थानमधील तिलोनिया येथे त्यांनी सामाजिक विकासाच्या कामाला सुरवात केली . पुढे याच कामातून बेअरफूट कॉलेजची स्थापना झाली .
राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती
बंकर रॉय यांच्या कामातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे ग्रामीण महिलांना तांत्रिक ज्ञान देण्याची संकल्पना .त्यांनी अशा महिलांची निवड केली . ज्यांना अनेकदा शाळेत जाण्याची संधीही मिळाली नव्हती . या महिलांना सौर पॅनेल बसवणे , बॅटरी जोडणे , दिवे दुरुस्त करणे आणि सौरऊर्जा यंत्रणा सांभाळणे याचे प्रशिक्षण देण्यात आले . या महिलांना सोलर मामा (Solar Mamas ) म्हणून ओळखले जाऊ लागले . भाषेची अडचण आणि औपचारिक शिक्षणाचा अभाव असूनही त्यांनी प्रत्यक्ष कामातून तांत्रिक कौशल्य आत्मसात केले . त्यामुळे गावांमध्ये वीजपुरवठयासाठी बाहेरील तज्ञांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली .
तिलोनिया येथील हा प्रयोग पुढे आंतराष्ट्रीय स्तरावर पोहोचला .आफ्रिका , आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील दुर्गम भागांमधील महिलांनीही बेअरफूट कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतले . प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या महिला आपल्या गावात परतल्या आणि सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासह त्यांच्या देखभालीची जबादारी सांभाळू लागल्या . बंकर रॉय यांच्या या कार्यक्रमाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली .
१९८६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . २०१० मध्ये टाइम मासिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांच्या समावेश केला . मात्र १० नोव्हेंबर २०२६ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले . त्यांच्या निधनाने ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी आयुष्यभर काम करणारा एक दूरदृष्टीचा समाजसेवक काळाच्या पडद्याआड गेला . त्यांचे कार्य आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे .






