सौजन्य फोटो - AI Gemini
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिमाहीसाठी यावर ६.९ टक्के ते ७.५ टक्केपर्यंत व्याज दिले जात आहे. पण यात बँक एफडीपेक्षा जास्त फायदा आहे का? १ लाख रुपये जमा केल्यावर किती व्याज मिळेल? कोणत्या कालावधीत किती रिटर्न मिळेल आणि गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागेल? याविषयीची सविस्तर माहिती पाहूया.
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही एक सरकारी स्मॉल सेव्हिंग स्किम आहे. यामध्ये तुम्ही एकरकमी रक्कम जमा करता आणि निवडलेल्या कालावधीच्या शेवटी तुम्हाला तुमची मुद्दल परत मिळते. एक, दोन, तीन आणि पाच वर्षे पैसे गुंतवण्याचे ऑप्शन यात उपलब्ध आहेत. किमान एक हजार रुपयांनी यात अकाउंट ओपन करता येते, त्यानंतरची गुंतवणूक १०० रुपयांच्या पटीत करता येते, तर गुंतवणुकीसाठी मॅक्सिमम लिमिट नाही.
या स्किमचे व्याजदर अकाउंट ओपन करतानाच ठरवले जातात आणि निवडलेल्या कालावधीसाठी तेच दर लागू राहतात. व्याजाचं कॅलक्युलेशन दर तीन महिन्यांनी होतं, पण पैसे मात्र वार्षिक दिले जातात. लक्षात ठेवा की, व्याजाची रक्कम अकाउंटमध्ये तशीच राहिल्यास त्यावर अतिरिक्त व्याज मिळत नाही.
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ च्या तिमाहीनुसार पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटचे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत:
हे व्याज दरवर्षी मिळू शकते. जसे की, ५ वर्षांच्या कालावधीत १ लाख रुपये जमा केल्यावर जवळपास ७,७१४ रुपयांचं वार्षिक व्याज मिळेल. ५ वर्षांत एकूण व्याज ३८,५७० रुपये होईल आणि टाइम पीरियड पूर्ण झाल्यावर १ लाख रुपयांची मुद्दल रक्कम परत मिळेप. म्हणजेच एकूण रक्कम १,३८,५७० रुपये होईल. हा एक अंदाज असून अकाउंट ओपन करण्याची तारीख आणि व्याजाच्या गणनेनुसार प्रत्यक्ष मिळणाऱ्या रकमेत किंचित फरक असू शकतो.
गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचा कालावधी, पैसे काढण्याचे नियम, टॅक्स लाभ आणि लागू व्याजदर अवश्य तपासून घ्यावेत. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये टॅक्सचा फायदा फक्त पाच वर्षांच्या कालावधीच्या अकाउंटवरच मिळतो. यात जमा केलेल्या रकमेवर आयकर अधिनियमाच्या कलम ८०C अंतर्गत सूटचा दावा केला जाऊ शकतो. मात्र, हा लाभ फक्त जुनी टॅक्स व्यवस्था निवडणाऱ्या करदात्यांनाच मिळतो. कलम ८०C अंतर्गत एकूण गुंतवणुकीवर जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याचा अर्थ असा होत नाही की या स्किममधील पूर्ण कमाई टॅक्स-फ्री आहे; अकाउंटवर मिळणारं व्याज हे तुमच्या उत्पन्नात जोडले जाते आणि लागू टॅक्स स्लॅबनुसार त्यावर टॅक्स द्यावा लागू शकतो.
महत्त्वाची टीप: गरज पडल्यास ६ महिने पूर्ण झाल्यानंतर वेळेपूर्वी अकाउंट बंद केलं जाऊ शकतं. पण असं केल्यास व्याज कमी मिळते. ६ महिने ते १ वर्षाच्या आत अकाउंट बंद केल्यास पोस्ट ऑफिस बचत अकाउंटचे व्याजदर लागू होतात. दीर्घ कालावधीचे अकाउंट बंद केल्यास ठरलेल्या कपातीचे नियम लागू होतात. त्यामुळे फक्त जास्त व्याज पाहून ५ वर्षांसाठी सर्व पैसे जमा करू नका. भविष्यात किंवा इमर्जन्सीमध्ये पैशांची गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन सर्व बचत एकाच कालावधीत गुंतवणे टाळावे.
Ans: या स्किममध्ये किमान १,००० रुपयांपासून अकाउंट उघडता येते आणि त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते.
Ans: ऑक्टोबर-डिसेंबर २०२६ तिमाहीसाठी ५ वर्षांच्या कालावधीवर ७.५ टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे.
Ans: या स्किममध्ये केवळ ५ वर्षांच्या कालावधीच्या अकाउंटवर जुन्या कर प्रणालीनुसार कलम ८०C अंतर्गत टॅक्स सूटचा लाभ घेता येतो.






