(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतातील १६०सीसी नेकेड स्ट्रीटफायटर सेगमेंटमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरू असून, TVS Apache RTR 160 4V आणि नवीन Bajaj Pulsar N160 SS या दोन्ही गाड्या या सेगमेंटमधील सर्वात आक्रमक पर्याय मानल्या जातात. दिल्लीमधील एक्स-शोरूम किंमतीनुसार, अपाचेच्या टॉप-एंड व्हेरियंटची किंमत १,३९,४४० रुपये आहे, तर बजाज पल्सर एन१६० एसएस ची किंमत १,४२,५८५ रुपये आहे.
डिझाइन आणि फ्रंट लुक
पूर्वीच्या अपाचेचा लूक कीटकासारख्या हेडलाइटमुळे वेगळा दिसत होता, परंतु नवीन-जनरेशन अपाचे आता बजाज पल्सर एन१60 एसएस सारखीच दिसते कारण दोन्ही बाइक्समध्ये एलईडी DRLs सह गोलाकार प्रोजेक्टर LED हेडलाइट देण्यात आला आहे. असे असले तरी, अपाचेचे हेडलाइट डिझाइन पल्सरपेक्षा थोडे जास्त आक्रमक भासते. दोन्ही बाइक्सच्या फ्रंटला प्रीमिअम लुक देणारे सोनेरी रंगाचे USD (Inverted) फॉर्क्स देण्यात आले आहेत, जे रायडिंग स्टेबिलिटी सुधारतात.
TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
इन्स्ट्रुमेंट कन्सोलच्या बाबतीत, दोन्ही गाड्यांमध्ये कनेक्टिव्हिटीसह आधुनिक TFT स्क्रीन मिळते. अपाचेमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळते, तर बजाजने यात एक पाऊल पुढे जात थेट गूगल मॅप्स मिररिंग सुविधा दिली आहे, ज्यामुळे अनोळखी मार्गांवर नेव्हिगेशन करणे अत्यंत सोपे होते.
इंजिन क्षमता आणि रायडिंग परफॉर्मन्स
इंजिनच्या बाबतीत, अपाचेमध्ये १५९.७cc, ४-व्हॉल्व्ह, एअर-ऑइल कुल्ड इंजिन दिले आहे, जे स्पोर्ट मोडमध्ये १७.५५ PS पॉवर आणि १४.७३ Nm टॉर्क जनरेट करते, तर यात अर्बन आणि रेन हे अतिरिक्त रायडिंग मोड्सही आहेत. दुसरीकडे, पल्सरमध्ये १६४.९cc, ४-व्हॉल्व्ह, एअर-ऑइल कुल्ड इंजिन आहे, जे सेगमेंट-बेस्ट १८.५ PS पॉवर आणि १४.४ Nm टॉर्क देते. पल्सरमध्ये इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल आणि चार रायडिंग मोड्स मिळतात. दोन्ही बाइक्सचे इंजिन पूर्णपणे ब्लॅक्ड-आऊट फिनिशिंगसह येते.
साईड प्रोफाईल आणि एक्झॉस्ट
अपाचेच्या मस्क्युलर टँकवर आकर्षक चेकर-फ्लॅग ग्राफिक्स पाहायला मिळतात आणि तिचे एक्झॉस्ट नेहमीच्या स्ट्रीटफायटर शैलीतील मोठे व भारदस्त आहे. याउलट, पल्सरच्या पॅनेल्सवर स्ट्रीट-रेस पिनस्ट्राइप्स दिले आहेत. पल्सरने गाडीचे वजन संतुलित ठेवण्यासाठी आणि क्लीन लूकसाठी अंडरबेली एक्झॉस्ट दिला आहे, तर अपाचेचा एक्झॉस्ट आवाज आणि आकारात जास्त ठळक आहे.
TVS Apache RTR 160 2V मध्ये मिळतायत हे भन्नाट फीचर्स! शोरूमला जाण्यापूर्वी नक्की जाणून घ्या!
रिअर डिझाइन (मागचा भाग)
मागील भागाचा विचार केला तर, अपाचेचे टेल युनिट सडपातळ आणि स्लिम आहे, ज्यावर पारंपरिक एलईडी लॅम्प शोभून दिसतो. पल्सरचा मागचा भाग अधिक चंकी आणि टणक आहे, ज्यावर कंपनीची आयकॉनिक ट्विन-स्ट्रिप LED टेल लाईट दिली आहे. पल्सरमध्ये दिलेला टायर हॅगर पावसाळ्यात पाण्याचे शिंतोडे उडण्यापासून उत्तम बचाव करतो, मात्र काही जणांना तो स्पोर्टी लूकच्या बाबतीत थोडा अडसर वाटू शकतो.
एकंदरीत, दोन्ही बाइक्स अतिशय स्पोर्टी आणि फिचर-लोडेड आहेत. पल्सर N160 SS मधील गूगल मॅप्स नेव्हिगेशन आणि जास्त पॉवर तिला दैनंदिन कम्युटिंगसाठी अधिक व्यावहारिक बनवतात, तर अपाचे तिची रेस-ट्यून आक्रमकता कायम राखते.






