(फोटो सौजन्य-AI एआय)
टीव्हीएस मोटर कंपनीने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस iQube फिलिपिन्सच्या मार्केटमध्ये लाँच केली आहे. Wheeltek च्या 50व्या वर्धापनदिनाच्या प्रदर्शनात या स्कूटरचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, पारंपरिक पेट्रोल स्कूटरच्या किंमतीच्या आसपास इलेक्ट्रिक स्कूटर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. फिलिपिन्समध्ये iQube ची सुरुवातीची किंमत P99,800 ठेवण्यात आली आहे.
4.6kW मोटर आणि 115km रेंज
टीव्हीएस iQube मध्ये 4.6kW हब-माउंटेड इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 125cc स्कूटरच्या कामगिरीशी तुलना करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरचा टॉप स्पीड 82km/h असून, 0 ते 40km/h वेग गाठण्यासाठी फक्त 4.2 सेकंद लागतात.
लॉंग राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की तपासा!
या स्कूटरमध्ये 3.5kWh क्षमतेच्या 2 बॅटरी पॅक बसवता येतात. दोन्ही बॅटरी वापरल्यास वास्तविक परिस्थितीत सुमारे 115km रेंज मिळते. चार्जिंगसाठी 950W पोर्टेबल चार्जर देण्यात आला असून, बॅटरी 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 3 तासांपेक्षा कमी वेळ लागतो.
स्मार्ट फीचर्स आणि मोठी स्टोरेज स्पेस
iQube मध्ये 7-इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. SmartXonnect आणि क्लाउड-कनेक्टेड फीचर्सच्या मदतीने Turn-by-Turn Navigation, कॉल आणि SMS अलर्ट, म्युझिक, Geofencing तसेच राइड आणि चार्जिंग स्टॅटिस्टिक्स पाहता येतात. स्कूटरमध्ये 32 लिटरची अंडरसीट स्टोरेज स्पेस असून, पार्किंग सोपे करण्यासाठी रिव्हर्स मोडही मिळतो.
5 वर्षांची वॉरंटी
टीव्हीएसने बॅटरी आणि मोटरसाठी 5 वर्षे किंवा 60,000km वॉरंटी दिली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, iQube ने जगभरात 10 लाख कस्टमर्सचा टप्पा पार केला आहे. फिलिपिन्समध्ये iQube सोबत टीव्हीएस Orbiter चेही प्रीव्ह्यू करण्यात आले असून, त्याची किंमत नंतर जाहीर केली जाणार आहे. याशिवाय टीव्हीएस King EV इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरलाही प्रदर्शनात सादर करण्यात आले.






