Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

TVS iQube: भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत असून, त्याचा फायदा TVS Motor Companyच्या विक्रीतही दिसून येत आहे. जुलै २०२६ मध्ये कंपनीने ४,३७,३९४ दुचाकींची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी अधिक आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 20, 2026 | 05:37 PM
212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्याचा फायदा आता कंपन्यांच्या विक्रीच्या आकडेवारीतही स्पष्टपणे दिसू लागला आहे. TVS Motor Company साठी जुलै महिना विशेष ठरला. कंपनीने या महिन्यात तब्बल 4,37,394 दुचाकी विकल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या विक्रीच्या तुलनेत यावेळी कंपनीची कामगिरी तब्बल 42 टक्क्यांनी चांगली राहिली.

जुलै 2025 मध्ये TVS ने 3,08,720 दुचाकी विकल्या होत्या. यंदा त्यात मोठी भर पडली आहे. एवढेच नाही, तर जूनच्या तुलनेतही कंपनीची विक्री वाढली आहे. जून 2026 मध्ये 4,11,014 दुचाकी विकल्या गेल्या होत्या. म्हणजे एका महिन्यातच विक्रीत जवळपास 6 टक्क्यांची वाढ झाली.

दोन मॉडेल्स ठरले गेमचेंजर

  • TVS च्या संपूर्ण पोर्टफोलिओकडे पाहिल्यास काही मॉडेल्सनी विशेष लक्ष वेधून घेतले. TVS RR 310 च्या विक्रीत तब्बल 350 टक्क्यांची वाढ झाली. मात्र, इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीची खरी ताकद TVS iQube ने दाखवून दिली.
  • iQube च्या विक्रीत वर्षभरात तब्बल 158 टक्क्यांची वाढ झाली. यावरून ग्राहकांचा इलेक्ट्रिक स्कूटरकडे वाढत असलेला कल सहज लक्षात येतो.

iQube ची विक्री किती झाली?

जुलै महिन्यात TVS iQube चे 59,386 युनिट्स विकले गेले. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 23,029 iQube स्कूटर विकल्या होत्या. म्हणजेच एका वर्षात विक्री जवळपास अडीच पट वाढली. जून 2026 मध्ये iQube ची 47,331 युनिट्स विकली गेली होती. त्याच्या तुलनेत जुलैमध्ये विक्रीत जवळपास 25 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या बाजारात iQube ने आपली पकड आणखी मजबूत केल्याचे दिसते.

किंमत बजेटनुसार बदलते

TVS iQube एकाच मॉडेलमध्ये मर्यादित नसून वेगवेगळ्या बॅटरी क्षमतेच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक आपल्या गरजेनुसार व्हेरिएंट निवडू शकतात. कंपनीकडून Battery-as-a-Service म्हणजेच BaaS पर्यायही दिला जातो. या पद्धतीत स्कूटरची सुरुवातीची किंमत कमी ठेवून बॅटरीसाठी वेगळे सबस्क्रिप्शन मॉडेल वापरले जाते. BaaS पर्यायात iQube ची सुरुवात सुमारे 59,999 रुपये एक्स-शोरूमपासून होते. बॅटरीसह 2.3kWh व्हेरिएंटची किंमत सुमारे 94,434 रुपये आहे. 3.1kWh मॉडेलची सुरुवात जवळपास 1 लाख रुपयांपासून होते. याशिवाय 3.5kWh बॅटरी असलेल्या मॉडेलची किंमत सुमारे 1.09 लाख रुपये, तर iQube S च्या 4.7kWh व्हेरिएंटची किंमत जवळपास 1.18 लाख रुपये आहे. 5.3kWh बॅटरीच्या मॉडेलसाठी सुमारे 1.59 लाख रुपये मोजावे लागतात.

एका चार्जमध्ये किती अंतर?

  • iQube ची खासियत फक्त विक्रीपुरती मर्यादित नाही. वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांमुळे ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार रेंज निवडण्याची संधी मिळते.
  • कंपनीच्या दाव्यानुसार, 5.3kWh बॅटरी असलेली iQube एका चार्जमध्ये 212 किमीपर्यंत धावू शकते. 4.7kWh मॉडेलची दावा केलेली रेंज 175 किमी आहे.
  • 3.5kWh व्हेरिएंट सुमारे 145 किमी, 3.1kWh मॉडेल 123 किमी आणि 2.3kWh बॅटरी असलेली स्कूटर 114 किमीपर्यंत अंतर कापू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

चार्जिंगचा खर्च किती?

इलेक्ट्रिक वाहन घेण्यामागे पेट्रोलचा वाढता खर्च हे एक मोठे कारण आहे. iQube मध्येही याच मुद्द्याचा फायदा ग्राहकांना मिळतो. उदाहरणार्थ, 5.3kWh बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी घरच्या विजेचा दर 10 रुपये प्रति युनिट धरल्यास अंदाजे 60 रुपयांच्या आसपास खर्च येऊ शकतो.

Tecno Pova 8 Pro 5G भारतात दाखल! ‘अलाइव्ह मॅट्रिक्स’ डिस्प्लेने वेधलं लक्ष; किंमत-फिचर्स जाणून घ्या

मात्र सार्वजनिक किंवा व्यावसायिक चार्जिंग स्टेशनवर शुल्क वेगळे असू शकते.

एकंदरीत पाहता, TVS iQube ची वाढती विक्री इलेक्ट्रिक स्कूटरला मिळणाऱ्या ग्राहकांच्या पसंतीचे चित्र दाखवते. वाढती रेंज, विविध बॅटरी पर्याय आणि BaaS सारखे पर्याय यामुळे iQube अनेक ग्राहकांसाठी विचार करण्यासारखा पर्याय बनला आहे. जुलैची विक्री पाहता TVS साठीही इलेक्ट्रिक सेगमेंट आता केवळ भविष्यातील बाजार राहिलेला नाही, तर सध्याच्या व्यवसायाचा महत्त्वाचा भाग बनत आहे.

Appleचा पुढचा मोठा धमाका! iPhone 18 Pro Max मध्ये मिळणार ‘हे’ खास अपग्रेड

Web Title: Tvs iqube sales surge 158 tvs records 437 lakh two wheeler sales in july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Tech News
  • TVS iQube
  • TVS iQube Electric Scooter

संबंधित बातम्या

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
1

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
2

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
3

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
4

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.