फोटो सौजन्य: Gemini
Citroen Aircross X महागली रे! कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या
पतंजली इलेक्ट्रिक बाईक भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तयार केली जाणार आहे. याचे डिझाइन साधे पण आधुनिक ठेवण्यात येईल, जेणेकरून सर्व वयोगटातील लोक ती सहज चालवू शकतील. मजबूत स्टील आणि अलॉय फ्रेमचा वापर केल्यामुळे ही बाईक दीर्घकाळ टिकाऊ ठरेल. जास्त ग्राउंड क्लिअरन्समुळे खराब रस्त्यांवरही आरामदायी प्रवास शक्य होतो. रुंद सीट आणि स्टेबल हँडलमुळे रायडरला थकवा जाणवत नाही. लूक साधा असला तरी पतंजली इलेक्ट्रिक बाईकची बांधणी मजबूत आणि विश्वासार्ह आहे, असे बोलले जात आहे.
पतंजली इलेक्ट्रिक बाईकमध्ये हाय एफिशियन्सी BLDC हब मोटर दिली जाण्याची शक्यता आहे. ही मोटर शहर आणि ग्रामीण भागातील प्रवासासाठी योग्य मानली जाते. बाईकमध्ये वेगवेगळे राइडिंग मोड्स मिळू शकतात, जसे की फुल इलेक्ट्रिक आणि पेडल असिस्ट. याचा टॉप स्पीड सुमारे 25 ते 30 किलोमीटर प्रति तास असू शकते, त्यामुळे ती लायसन्सशिवाय चालवता येईल.
पतंजली इलेक्ट्रिक बाईकची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची लॉन्ग रेंज. रिपोर्ट्सनुसार, यात लिथियम आयन बॅटरी दिली जाऊ शकते, जी एकदा फुल चार्ज केल्यानंतर सुमारे 320 किलोमीटरपर्यंत धावू शकते. बॅटरी काढता येण्यासारखी असल्याने घर किंवा ऑफिसमध्ये चार्ज करणे सोपे होईल. केवळ 3 ते 4 तासांत फुल चार्ज होण्याची क्षमता ही बाईक वेळेची बचत करणारा पर्याय बनवते.
अद्याप तरी पतंजली कंपनीकडून त्यांच्या ई बाईक संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.






