Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँच होताच ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरने ग्राहकांचे जिंकले मन ! आतापर्यंत मिळाले 50 हजारपेक्षा जास्त बुकींग

हल्ली भारतात अनेक उत्तम इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होताना दिसत आहे. अशातच आता मार्केटमध्ये एक अशी इलेक्ट्रिक स्कूटर आली आहे, जिला मार्केटमध्ये प्रचंड मागणी मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2025 | 09:57 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Follow Us:

भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढताना दिसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत होणारी वाढ आणि इलेक्ट्रिक वाहनांची चांगली रेंज. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या आता भारतात उत्तम फीचर्ससह इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहेत. ग्राहक देखील या इलेक्ट्रिक वाहनांना सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. पर्यावरणपूरक असलेल्या या वाहनांचा वापर वाढत आहे, कारण ते खर्चिक आणि प्रदूषण कमी करणारे आहेत. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय होण्याची अपेक्षा आहे.

देशात अनेक इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे Ultraviolette. नुकतेच या कंपनीने भारतीय बाजारात त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर टेसेरॅक्ट लाँच केली आहे. कंपनीने लाँचिंगसोबतच बुकिंग देखील सुरू केले आहे. आता कंपनीने सांगितले की या इलेक्ट्रिक स्कूटरला 50,000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. पहिल्या स्लॉटनंतर अल्ट्राव्हायोलेट अतिरिक्त 30,000 बुकिंगची ऑफर देत आहे. टेसरॅक्टची किंमत 1 लाख 20 हजार रुपयांपासून सुरु होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे कार खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री ! EV आणि CNG कार महागणार

Tesseract ची डिलिव्हरी 2026 च्या पहिल्या तिमाहीत सुरू होईल. कंपनीने ही स्कूटर डेझर्ट सँड, सोनिक पिंक आणि स्टील्थ ब्लॅक या 3 रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली आहे. अल्ट्राव्हायोलेट टेसरॅक्टला 3.5 किलोवॅट तास, 5 किलोवॅट तास आणि 6 किलोवॅट तास असे तीन बॅटरी पर्याय मिळतील. त्याच वेळी, या स्कूटरमध्ये 20.1 बीएचपी पॉवर असलेली इलेक्ट्रिक मोटर असेल. पूर्ण हेल्मेट ठेवण्यासाठी यात 34 लिटर अंडरसीट स्टोरेज देखील आहे.

अल्ट्राव्हायोलेटने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक फीचर्स दिले गेले आहेत. अ‍ॅक्सेसरीजच्या यादीमध्ये पुढील आणि मागील कॅमेरे असलेले ड्युअल रडार समाविष्ट आहेत, जे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ओव्हरटेक अलर्ट आणि टक्कर अलर्ट सक्षम करतात. याव्यतिरिक्त, यात फ्लोटिंग DRLS सह ड्युअल LED-प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि कनेक्टिव्हिटी सूट आणि राइड अ‍ॅनालिटिक्ससह मोठा TFT टचस्क्रीन डिस्प्ले आहे.

मार्केट गाजवण्यासाठी लवकरच येणार नवीन Maruti Wagon R, भारतात होणार का लाँच?

यात किलेस अ‍ॅक्सेस, पार्क असिस्ट, हिल होल्ड, क्रूझ कंट्रोल, नेव्हिगेशन, म्युजिक कंट्रोल आणि बरेच काही आहे. टेसेरॅक्टमध्ये 14-इंच चाके आहेत. तसेच पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक सेटअप आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या स्कूटरमध्ये ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम आणि डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांचा समावेश आहे.

Web Title: Ultraviolette tesseract has received the booking of more than 50000 units

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.