फोटो सौजन्य: iStock
सध्या राज्यभरात इलेक्ट्रिक कारची मागणी वेगाने वाढताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या देशात बेस्ट इलेक्ट्रिक कार ऑफर करत असतात. पण जरी इलेक्ट्रिक कारची विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी CNG कार खरेदी करणे कमी झालेले नाही. आजही अनेक ऑटो कंपन्या आपल्या कारचे CNG व्हर्जन बाजारात लाँच करत असतात. एवढेच काय आता तर सीएनजी बाईक आणि स्कूटर देखील बाजारात दाखल होताना दिसत आहे. पण आता महाराष्ट्रात इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार महाग होणार आहे. पण यामागचे नेमके कारण काय?
महाराष्ट्र मोटार वाहन कायदा 1958 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधानसभेत नुकतेच एक विधेयक सादर करण्यात आले, ज्याचा उद्देश वाहनांवरील कर वाढवणे असा आहे. यासोबतच अतिरिक्त महसूल निर्माण करणे असा देखील याचा उद्देश आहे. यामुळे कार EV आणि CNG कार खरेदी करणाऱ्यांच्या बजेटवर परिणाम होणार आहे. कारण कर वाढल्याने खिशावर भार पडण्याची शक्यता आहे.
मार्केट गाजवण्यासाठी लवकरच येणार नवीन Maruti Wagon R, भारतात होणार का लाँच?
महाराष्ट्र मोटार वाहन कर कायदा 2025 विधेयकात दुचाकी, मोटारकार, ट्रायसायकल आणि ओम्नी बससाठी एकवेळ कराची जास्तीतजास्त मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. एवढेच नाही तर सीएनजी आणि लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहनांवरील करही 1 टक्क्याने वाढवला जाणार आहे.
हे विधेयक राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडले आहे. कर वाढीमुळे सीएनजी वाहने खरेदी करणाऱ्या लोकांना यामुळे मोठा धक्का बसणार आहे, या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांवर होईल.
महाराष्ट्रचा अर्थसंकल्प 2025-26 मध्ये 30 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6 टक्के मोटार वाहन कर, तर सीएनजी आणि एलपीजी वाहनांच्या करात 1 टक्के वाढ होणार आहे. बांधकाम वाहने आणि हलक्या वस्तूंच्या वाहनांवर देखील 7 टक्के कर प्रस्तावित आहे.
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाकडून स्वस्त किमतीत उत्तम परफॉर्मन्स देणारी OBD2B Shine 100 लाँच
दुरुस्ती विधेयकात क्रेन, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर इत्यादी बांधकाम कामात वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदणीच्या वेळी त्यांच्या किमतीच्या 7 टक्के एक रकमी कर आकारण्याचा प्रस्ताव आहे. या दुरुस्तीमध्ये 7500 किलो पर्यंतच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर एक रकमी 7 टक्के कर देखील समाविष्ट आहे.
वर नमूद केलेल्या सर्व वाहनांच्या किमती पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून वाढणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारला एका वर्षात 1300 कोटी रुपये मिळू शकतात.