
फोटो सौजन्य: iStock
गेल्या 2 वर्षांत भारतात इलेक्ट्रिक कार्सची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. 2025 मध्ये केवळ एप्रिल ते ऑक्टोंबर या काळात 1 लाखाहून अधिक इलेक्ट्रिक वाहने रजिस्टर झाली आहेत, जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहेत. या आकड्यांवरून स्पष्ट होते की भारतीय ग्राहक आता EVs वर अधिक विश्वास ठेवू लागले आहेत. वाढता चार्जिंग नेटवर्क, सुधारलेली बॅटरी टेक्नॉलॉजी आणि सरकारच्या EV पॉलिसीमुळे हा बदल आणखी वेगाने घडत आहे.
सध्या Maruti Suzuki, Tata Motors, आणि Mahindra यांसारख्या मोठ्या ऑटो कंपन्या त्यांच्या नेक्स्ट-जन इलेक्ट्रिक SUVs लाँच करण्यासाठी सज्ज होत आहेत. येत्या काही महिन्यांत Maruti e-Vitara, Tata Sierra EV आणि Mahindra XEV 9S भारतीय बाजारात दाखल होणार आहेत.
भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज
Maruti Suzuki आपली पहिली इलेक्ट्रिक SUV e-Vitara भारतात 2 डिसेंबर 2025 रोजी लाँच
करणार आहे. या SUV मध्ये 49 kWh आणि 61 kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय असतील.
मोठ्या बॅटरी पॅकसोबत Dual Motor आणि AWD System चीही सुविधा दिली जाईल, ज्यामुळे परफॉर्मन्स आणि स्टेबिलिटी दोन्ही वाढतील. कंपनीचा दावा आहे की e-Vitara एकदा फुल चार्ज केल्यानंतर 500 km पेक्षा जास्त रेंज देऊ शकेल. ही रेंज तिला Tata Nexon EV, MG ZS EV आणि Hyundai Kona यांच्या बरोबरीत किंवा त्याहूनही पुढे नेईल.
Tata Motors आपली आयकॉनिक SUV Sierra चे इलेक्ट्रिक व्हर्जन 2025 च्या अखेरीस लॉन्च करणार आहे. याचे अधिकृत अनावरण 25 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. Sierra EV ला Harrier EV सारख्या पॉवरट्रेन सेटअपसह आणले जाईल. यात 65 kWh आणि 75 kWh असे दोन बॅटरी पॅक दिले जातील.
Sierra EV जवळपास 500 km+ रेंज देऊ शकेल, ज्यामुळे ती लांब प्रवास आणि दैनंदिन वापर—दोन्हींसाठी उत्तम पर्याय ठरेल. बाह्य डिझाइन फ्यूचरिस्टिक असून यात पॅनोरमिक ग्लास, कनेक्टेड टेललॅम्प्स, दमदार बॉडी लाइन्स आणि प्रीमियम केबिन लेआउट दिले जाणार आहे.
Mahindra आपली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV XEV 9S भारतात 27 नोव्हेंबर 2025 रोजी लॉन्च करणार आहे. ही SUV XEV 9e प्लॅटफॉर्मवर आधारित असून तंत्रज्ञान, डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीत कंपनीचे सर्वात आधुनिक मॉडेल असल्याचे मानले जाते.
यात 59 kWh आणि 79 kWh असे दोन बॅटरी पॅक असतील. मोठा 79 kWh वेरिएंट 600+ km ची प्रभावी रेंज देईल. 7-सीटर लेआउटमुळे ही SUV फॅमिलीसाठी आदर्श पर्याय ठरू शकते. या कारच्या केबिनमध्ये
असे अनेक हाई-एंड फीचर्स मिळतील.