Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’

उत्तर प्रदेशातील एका शोरूममध्ये मध्यरात्री अत्यंत अनपेक्षित आणि विचित्र प्रकार घडल्याने पोलीस प्रशासनासह नागरिकही थक्क झाले आहेत. चोरी करण्याच्या इराद्याने आत शिरलेल्या एका व्यक्तीच्या भन्नाट कृत्यामुळे ही घटना संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 14, 2026 | 11:26 PM
कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’
Follow Us
Follow Us:
  • वाराणसीतील एका प्रसिद्ध वाहनांच्या शोरूममध्ये मध्यरात्री अत्यंत अनोखी आणि विचित्र चोरीची घटना घडली आहे.
  • चोराने थेट चोरी करण्याऐवजी शोरूममध्ये तब्बल साडेचार तास मुक्काम करत अजब कारनामे केले.
  • सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आता ४.७१ लाखांची केटीएम बाईक घेऊन पळालेल्या चोराचा शोध घेत आहेत.

वाराणसीमधील एका वाहनांच्या शोरूममध्ये मध्यरात्री घडलेल्या एका अजब चोरीच्या घटनेने पोलीस आणि नागरिक दोघेही अवाक झाले आहेत. शोरूममध्ये घुसलेल्या चोराने लगेच चोरी करून पळ काढण्याऐवजी तब्बल साडेचार तास तिथेच मुक्काम ठोकला. या वेळेत त्याने तिथे गरम कॉफी बनवून पिली, आंघोळ केली, गाणी लावून डान्स केला चांगल्या थाटामाटात आराम करून सरतेशेवटी ४.७१ लाख रुपये किमतीची नवीन केटीएम बाईक घेऊन पसार झाला.

ग्लास डोअर तोडून शोरूममध्ये प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता शोरूम बंद केले होते. रात्री ११:३० च्या सुमारास पांढरा शर्ट आणि जीन्स घातलेला एक तरुण तिथे आला. पाऊस सुरू झाल्याने त्याने आधी एका बॅनरचा आसरा घेतला आणि नंतर कटरच्या साहाय्याने शोरूमचा काचेचा दरवाजा कापण्याचा प्रयत्न केला. जवळपास ३६ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री १२:०६ वाजता तो शोरूमच्या आत शिरला.

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!

शोरूममध्ये साडेचार तास चालला होता ‘व्हीआयपी‘ थाट

शोरूममध्ये प्रवेश केल्यानंतर या चोराने दाखवलेला निवांतपणा अगदी थक्क करणारा होता. त्याने पहिल्यांदा रिसेप्शनवरील कॉम्प्युटर सुरू केला आणि रिव्हॉल्व्हिंग खुर्चीवर बसून गिरक्या घेतल्या. त्यानंतर फ्रिजमधून थंड पाणी पिऊन त्याने स्वतःसाठी मस्त गरम कॉफी बनवली. एवढ्यावरच थांबला नाही तर तो वॉशरूममध्ये गेला, तिथे शॉवर घेतला आणि आपले ओले कपडेही वाळत घातले.

कमाल म्हणजे नवीन गाडीचे कव्हर अंगाभोवती लुंगीसारखे गुंडाळून त्याने कॉम्प्युटरवर गाणी लावली आणि मनसोक्त डान्स केला. पळून जाण्यापूर्वी त्याने शोरूममध्ये विक्रीसाठी ठेवलेला ब्रँडेड टी-शर्ट आणि कॅप घातली होती.

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य

४.७१ लाखांची केटीएम बाईक घेऊन झाला बेपत्ता

पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास, शोरूमच्या व्यवस्थापकाची चावी असलेली ४.७१ लाख रुपयांची केटीएम बाईक त्याने सुरू केली आणि तिथून पळ काढला आणि बेपत्ता झाला. सकाळी गार्डला काच तुटलेली दिसल्यानंतर या विचित्र चोरीचा प्रकार उघडकीस आला.

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना या सर्व भन्नाट प्रकाराची माहिती मिळाली. सध्या वाराणसी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या अनोख्या चोराचा आणि चोरीला गेलेल्या बाईकचा शोध घेत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर वेगवेगळ्या इंटरेस्टिंग प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Varanasi bizarre ktm bike theft viral news auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 11:26 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.