
Lightweight Helmet: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
बेळगावात एका मोठ्या कार्यक्रमात या हेल्मेटचं अनावरण करण्यात आलं. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या हेल्मेटचं वजन फक्त 1050 ग्रॅम आहे. म्हणजे एक किलोच्या थोडं जास्त. हातात घेतल्यावर कळणारच नाही की हेल्मेट घातलंय. ऑटोमोबाइल
बऱ्याच लोकांना वाटेल की हेल्मेट हलकं आहे म्हणजे सुरक्षित नसेल. पण तसं अजिबात नाही. कंपनीने सांगितलं आहे की सुरक्षिततेत एक टक्का पण तडजोड केलेली नाही. हे हेल्मेट बनवण्यासाठी कार्बन फायबरचा वापर केला आहे. कार्बन फायबर मजबूत तर असतंच पण वजनाला एकदम हलकं असतं.या हेल्मेटला जगातील तीन मोठी प्रमाणपत्र मिळाली आहेत. ECE 22.06, DOT आणि आपलं भारतीय ISI.
ही तीन सर्टिफिकेट मिळवणं सोपी गोष्ट नाही. याचा अर्थ हे हेल्मेट आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या सुरक्षा चाचण्यांमध्ये पास झालं आहे. ऑफ-रोड रायडिंगसाठी तर हे हेल्मेट एकदम बेस्ट आहे. जगात असं हलकं ट्रिपल सर्टिफाईड ऑफ-रोड हेल्मेट दुसरं कोणी बनवलेलं नाही.
जे लोक लांब बाईक रायडिंग करतात किंवा डोंगरात, खडतर रस्त्यावर गाडी चालवतात त्यांना हलक्या हेल्मेटचं महत्त्व चांगलं माहिती आहे. जड हेल्मेटमुळे मानेवर खूप ताण येतो. काही वेळाने मान आखडायला लागते. पण हे 1050 ग्रॅमचं हेल्मेट घातल्यावर तो त्रास खूप कमी होतो. तुम्ही तासनतास बाईक चालवू शकता.
ह्युंदाई बेयॉन एसयूव्ही भारतात 26 ऑक्टोबरला होणार लाँच; किंमत, इंजिन आणि फीचर्स जाणून घ्या
कंपनीने सांगितलं की, हे हेल्मेट बनवणं सोपं नव्हतं. फक्त वजन कमी करायचं नव्हतं, तर कार्बन फायबर कसं वापरायचं, त्याची रचना कशी ठेवायची आणि उत्पादन कसं करायचं याचा सगळा ताळमेळ बसवावा लागला. तेव्हा कुठे हे शक्य झालं.
सुरक्षा आणि वजन दोन्ही गोष्टी सांभाळणं हे खरं चॅलेंज होतं.पूर्णपणे मेड इन बेळगावया गोष्टीचा सगळ्यात जास्त अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे या हेल्मेटचं डिझाइन आणि उत्पादन दोन्ही बेळगावातच झालं आहे. बाहेरून काही आणलेलं नाही. वेगा ऑटोचे अध्यक्ष दिलीप चांडक यांनी सांगितलं की कार्बन फायबरमध्ये आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहोत. भारतात बनलेलं हे प्रॉडक्ट जागतिक दर्जाचं आहे आणि हे आमच्या इंजिनिअरिंगची ताकद दाखवतं.
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर गिरधारी चांडक म्हणाले की, आमचा उद्देश फक्त हलकं हेल्मेट बनवणं नव्हता. आम्हाला साहित्य, डिझाइन आणि प्रोडक्शन या तीन गोष्टींचा योग्य वापर करून सुरक्षित हेल्मेट बनवायचं होतं आणि आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत.
ह्युंदाई आणि किया आणणार सीएनजी एसयूव्ही! व्हेन्यू आणि सोनेटसारख्या मॉडेल्सवर लक्ष; जाणून घ्या
या कार्यक्रमाला उत्तम चांडक, कुणाल चांडक, पार्थ चांडक आणि कंपनीचे सगळे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बेळगावात बनलेलं हे हेल्मेट आता जगभरात विकलं जाणार आहे, ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.