फोटो सौजन्य: @imVkohli(X.com)
भारतीय क्रिकेटच्या इतिहास नेहमीच विराट कोहलीचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. याव्यतिरिक्त, असंख्य भारतीय चाहत्यांचे प्रेम कोहलीला मिळत असते. आपल्या खेळाच्या जोरावर, विराट कोहली आता भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका महत्वाचा खेळाडू बनला आहे. विविध रेकॉर्ड्स नावावर असण्यासोबतच आलिशान कार्स देखील किंग कोहलीच्या नावावर आहेत.
नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का होता. क्रिकेटव्यतिरिक्त, विराटला लक्झरी कारचीही आवड आहे. विराट कोहलीच्या गॅरेजमध्ये कोणत्या लक्झरी कार आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
‘या’ कंपनीच्या कारवर ग्राहकांचा जडला जीव ! May 2025 मध्ये 22,315 ग्राहकांनी केली खरेदी
विराट अनेकदा दिल्ली आणि मुंबईच्या रस्त्यांवर या लक्झरी कार चालवताना दिसला आहे. जेव्हा विराट दिल्लीत असतो तेव्हा तो अरुण जेटली स्टेडियमवर पोहोचण्यासाठी स्वतःची कार वापरतो. त्याच्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी लाइफस्टाइलची झलक दिसून येते.
विराट कोहली हा बऱ्याच काळापासून ऑडी इंडियाचा ब्रँड अँबेसिडर आहे, त्यामुळे त्याच्या गॅरेजमध्ये ऑडी R8 LMX आणि ऑडी R8 V10 Plus सारख्या सुपर लक्झरी स्पोर्ट्स कार आहेत, ज्यांची किंमत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याशिवाय, त्याच्याकडे ऑडी A8 L, ऑडी Q8, RS5, Q7 आणि S5 सारखे इतर मॉडेल देखील आहेत, ज्यांची किंमत 1 कोटी ते 2 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये बेंटले फ्लाइंग स्पर देखील समाविष्ट आहे, ज्याची किंमत 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. लॅम्बोर्गिनी अव्हेंटाडोर एस ही विराट कोहलीच्या सर्वात महागड्या कारपैकी एक आहे, ज्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. विराटच्या कार कलेक्शनमध्ये अॅस्टन मार्टिन DB11 देखील समाविष्ट आहे, ज्याची किंमत 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जी देखील त्याची स्टायलिश आणि प्रीमियम निवड दर्शवते.
Tata Curvv ला एकतर्फी टक्कर देणारी ‘ही’ SUV झाली महाग, खिसा होणार अजूनच रिकामा
पोर्श 911 Turbo S ही त्याच्या कार कलेक्शनमध्ये एक परफॉर्मन्स-ड्रिव्हन स्पोर्ट्स कार आहे, ज्याची किंमत सुमारे 3.4 कोटी रुपये आहे. याशिवाय, फेरारी 488 जीटीबी ही विराट कोहलीची आणखी एक हाय-स्पीड स्पोर्ट्स कार आहे, ज्याची किंमत 4 कोटींहून अधिक आहे आणि ती स्पीडबद्दलची त्याची आवड दर्शवते.
BMW M5 सारख्या स्पोर्ट्स सेडान, ज्याची किंमत 2 कोटींहून अधिक आहे आणि रेंज रोव्हर व्होग, ज्याची किंमत देखील सुमारे 2 कोटी आहे, जे विराटचा दैनंदिन लक्झरी आणि ऑफ-रोडिंगचा छंद पूर्ण करतात. याशिवाय, विराट कोहलीकडे टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्ही देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 40 लाख आहे.