फोटो सौजन्य: @Parth_Go (X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपन्या कार्यरत आहेत. यातीलच एक बलाढ्य आणि आघाडीची वाहन उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. टाटाने देशात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. याव्यतिरिक्त, प्रीमियम सेगमेंटमध्ये कंपनीने Tata Curvv लाँच केली होती, ज्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
Tata Curvv ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये अन्य ऑटो कंपन्यांनी दमदार SUV आणल्या आहेत. त्यातीलच एका SUV च्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. ही एसयूव्ही म्हणजे Citroen Basalt.
फ्रेंच कार निर्माता कंपनी सिट्रोएनने पुन्हा एकदा सिट्रोएन बेसाल्टची किंमत वाढवली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला सिट्रोएनने भारतात बेसाल्टची किंमत 28,000 रुपयांनी वाढवली होती. आता बेसाल्टची किंमत पुन्हा 8,001 रुपयांनी वाढली आहे. मात्र, Basalt Plus MT आणि अलीकडेच लाँच झालेल्या बेसाल्ट डार्क एडिशनच्या किमती भारतात बदललेल्या नाहीत. सिट्रोएन बेसाल्टच्या किमती वाढल्यानंतर या कूप एसयूव्हीच्या नवीन आणि जुन्या किमतीमधील फरक आज आपण जाणून घेऊयात.
‘या’ नवीन SUV ची ग्राहकांना भुरळ ! 3 महिन्यांवर पोहोचला वेटिंग पिरियड
सिट्रोएनने आपल्या बेसॉल्ट SUVच्या विविध व्हेरियंट्सच्या किंमतींमध्ये किरकोळ वाढ केली आहे. बेस व्हेरियंट ‘You MT’ आता ₹8,25,000 ऐवजी ₹8,32,000 मध्ये मिळतो, म्हणजेच ₹7,000 ची वाढ झाली आहे. ‘प्लस एमटी’ व्हेरियंटची किंमत ₹9,99,000 वर कायम असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ‘प्लस टर्बो एमटी’ ₹11,77,000 वरून ₹11,84,000 झाला आहे, तर ‘मॅक्स टर्बो एमटी’ ₹12,49,000 वरून ₹12,57,000 झाला असून या दोन्ही व्हेरियंट्समध्ये अनुक्रमे ₹7,000 व ₹8,000 ची वाढ झाली आहे.
‘मॅक्स टर्बो एमटी ड्युअल टोन’ व्हेरियंट ₹12,70,000 वरून ₹12,78,000 झाला असून ₹8,000 ने महाग झाला आहे. ‘प्लस टर्बो एटी’ आता ₹13,14,000 मध्ये उपलब्ध असून पूर्वी त्याची किंमत ₹13,07,000 होती, म्हणजेच ₹7,000 ची वाढ. ‘मॅक्स टर्बो एटी’ ₹13,79,000 वरून ₹13,87,000 झाला आहे, तर ‘मॅक्स टर्बो एटी ड्युअल टोन’ ₹13,99,999 वरून ₹14,08,000 झाला आहे – या दोन्ही व्हेरियंट्समध्ये अनुक्रमे ₹8,000 व ₹8,001 ची वाढ झाली आहे.
Ola S1Z आणि Ola Gig च्या डिलिव्हरीत विलंब, कंपनीच्या CEO ने सांगितले कारण
दरम्यान, Turbo Max Dark Edition MT आणि Turbo Max Dark Edition AT या दोन्ही टॉप व्हेरियंट्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
सिट्रोएन बेसाल्टच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, त्यातील नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन 19.5 किमी प्रति लिटर मायलेज देण्यास सक्षम आहे, तर टर्बो पेट्रोल इंजिन मॅन्युअल गिअरबॉक्ससह 19.5 किमी प्रति लिटर आणि ऑटोमॅटिकसह 18.7 किमी प्रति लिटर मायलेज देते.