फोटो सौजन्य: Gemini
भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योगात आज एक नवीन गोष्ट जोडली आहे. MATTER कंपनीने Technology Day 3.0 या प्लॅटफॉर्मवर भारतातील पहिले AI-Defined Vehicle (AIDV) प्लॅटफॉर्म सादर केले आहे. हा लाँच केवळ नव्या तंत्रज्ञानाची घोषणा नसून, भविष्यात टू-व्हीलर वाहने फक्त इलेक्ट्रिक न राहता अधिक उत्तम आणि स्मार्ट सिस्टिमने सुसज्ज असतील, याचे स्पष्ट संकेत देतो.
नवीन कलर ऑप्शन्ससह MG Cyberster सादर! मिळणार 507 किलोमीटरची रेंज
या प्लॅटफॉर्मद्वारे MATTER ने स्वतःला केवळ एक EV उत्पादक न ठेवता, डीप-टेक कंपनी म्हणून उभे केले आहे. कंपनीच्या मते, येत्या काळात टू-व्हीलर वाहनांची खरी ओळख त्यांच्या बुद्धिमत्तेवर ठरणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने वाहन स्वतःची परफॉर्मन्स, कार्यक्षमता आणि सुरक्षितता वेळोवेळी सुधारत राहील, ज्यामुळे रायडिंगचा अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.
AI-Defined Vehicle ही पारंपरिक इलेक्ट्रिक टू-व्हीलरपेक्षा पूर्णपणे वेगळ्या संकल्पनेवर आधारित असणार आहे. या तंत्रज्ञानात वाहनाचे वर्तन AI सिस्टम रिअल-टाइम डेटाच्या आधारे मोटर, बॅटरी आणि थर्मल मॅनेजमेंटचे नियंत्रण करते. यामुळे प्रत्येक परिस्थितीत वाहन उत्तम परफॉर्मन्स देते आणि त्यातील घटकांचे आयुष्यही वाढते.
फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
MATTER चे फ्लॅगशिप मॉडेल AERA हे आधीच Software-Defined Vehicle तंत्रज्ञानावर आधारित आहे. सॉफ्टवेअर अपडेट्सच्या माध्यमातून हार्डवेअर न बदलता परफॉर्मन्स आणि फीचर्समध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. हाच अनुभव आता AI-Defined प्लॅटफॉर्मचा पाया ठरला असून, भविष्यातील मोबिलिटी अधिक स्मार्ट बनवण्याची दिशा दाखवतो.
MATTER ने पुढील 36 ते 48 महिन्यांत विविध टू-व्हीलर सेगमेंटमध्ये नवे प्रॉडक्ट्स लाँच करण्याची माहिती दिली आहे. ही सर्व वाहने एकाच AI-Defined टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्मवर आधारित असतील, ज्यामुळे प्रत्येक सेगमेंटमध्ये समान स्मार्ट, सुरक्षित आणि प्रगत रायडिंग अनुभव मिळणार आहे.






