
अव्होर इलेक्ट्रिक या समर्थ ई-मोबिलिटी समूहातील भारतामधील स्वदेशी, तंत्रज्ञानाला प्राधान्य देणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने आज आपली पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल अव्होर इलेक्ट्रिक ईएक्स (अव्होर इलेक्ट्रिक एलिव्हेटेड एक्सपिरियन्स)च्या लाँचची घोषणा केली. भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरलेल्या EX Series चे अनावरण गुजरातचे माननीय मुख्यमंत्री श्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. ईएक्स २एस, ईएक्स २ आणि ईएक्स १ या तीन व्हेरिएंट्समध्ये १,२४,९९९ रुपये (एक्स-शोरूम) या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असलेली ईएक्स स्वदेशी तंत्रज्ञान, इंटेलिजण्ट अभियांत्रिकी आणि दैनंदिन व्यावहारिकतेद्वारे इलेक्ट्रिक मोटरसायकलिंगला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पूर्णपणे नव्याने डिझाइन करण्यात आली आहे.
इंटेलिजन्स दुचाकीमध्ये फक्त जोडलेली एखादी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट नसून ज्यावर ती संकल्पित केली आहे तो पायाच असावा या विश्वासावर तयार झालेल्या अव्होर इलेक्ट्रिकची संकल्पना एकाच मार्गदर्शक तत्त्वाभोवती रचली गेली आहे: इंटेलिजन्सपासून सुरुवात करा आणि मग त्याभोवती मोटरसायकल तयार करा. ब्रँडचे हे तत्त्वज्ञान त्यांच्या ‘इंटेलिजन्स बियॉन्ड मोशन’ या टॅगलाइनमधून दिसून येते.
महत्त्वाकांक्षी डिझाइन. रायडरला प्रथम प्राधान्य देणारी इंटेलिजन्स.
अव्होर इलेक्ट्रिक ईएक्स डिझाइन शैली सादर करते, जी महत्त्वाकांक्षी आणि कालातीत आहे. विशेषतः भारतातील रायडर्ससाठी डिझाइन केलेली ही मोटरसायकल आयसीईकडून इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे होणारा बदल केवळ तंत्रज्ञानातच नाही तर रायडिंगची पद्धत, अर्गोनॉमिक्स आणि एकंदरीत मालकीच्या अनुभवात नैसर्गिक वाटायला लावते.
ही मोटरसायकल विशिष्ट ड्युअल-टोन स्टाइलिंग, सिग्नेचर टँक लाइट्स आणि मॅन्युअल व ऑटोमॅटिक दोन्ही रायडिंग मोडच्या स्थिरतेद्वारे परिचित मोटरसायकलच्या प्रमाणांना आधुनिक ईव्ही अभियांत्रिकीशी जोडते. पारंपारिक मोटरसायकल प्रेमींना आकर्षित करताना आपल्या नेक्स्ट-जनरेशन इलेक्ट्रिक वैशिष्ट्यांचे आत्मविश्वासाने प्रदर्शन करण्यासाठी ही मोटरसायकल डिझाइन करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! Bajaj Auto ने महसूल आणि निर्यातीत रचला नवा इतिहास
दैनंदिन रायडिंगसाठी डिझाइन केलेली कार्यक्षमता
अव्होर इलेक्ट्रिक ईएक्सच्या केंद्रस्थानी अत्यंत कार्यक्षम, रेअर-अर्थ-फ्री पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर (पीएमएसएम) आहे, ज्यामधून स्थिरता, पुरवठा साखळीतील स्वातंत्र्य आणि दीर्घकालीन शाश्वततेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या स्वदेशी सोर्सिंग धोरणाप्रती ब्रँडची कटिबद्धता दिसून येते.
व्हेरिएंटनुसार, ही मोटरसायकल ७.५ केडब्ल्यू ते १०.५ केडब्ल्यू कमाल पॉवर प्रदान करते आणि शहरातील रस्ते, तसेच महामार्गांवर तितकाच आनंददायी रायडिंगचा अनुभव देण्यासाठी तिन्ही व्हेरिएंट्समध्ये २५० एनएम पीक व्हील टॉर्क निर्माण करते. ईएक्स २एस ११४ किमी/तास टॉप स्पीड गाठते, तर ईएक्स २ आणि ईएक्स १ या १०० किमी/तास वेग गाठतात.
रायडिंगचा अनुभव आणखी वाढवणारी गोष्ट म्हणजे उद्योग क्षेत्रातील प्रथम असलेली इंटिग्रेटेड मोटर + स्विंगआर्म पॉवरट्रेन (ड्राइव्ह लिंक आर्म), जी वजन वितरण, रचनात्मक मजबूती आणि हाताळणीची गतिशीलता सुधारण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे अधिक स्थिरता मिळते आणि रायडरचा आत्मविश्वास वाढतो.
रेंजबाबत चिंता दूर
ईव्हीच्या वापरासमोरील सर्वात मोठ्या अडथळ्यावर मात करत अव्होर ईएक्स प्रत्येक प्रवासात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ईएक्स २एस व ईएक्स २ या अनुक्रमे २६० किमी आणि २५५ किमीची आयडीसी-प्रमाणित रेंज देतात, तर ईएक्स १ १६० किमीची आयडीसी-प्रमाणित रेंज प्रदान करते.
चार्जिंगची सुविधा देखील जास्तीत-जास्त सोयीसाठी डिझाइन करण्यात आली आहे. सर्व व्हेरिएंट्समध्ये 1500 वॅट ऑनबोर्ड फास्ट चार्जर बसवलेला आहे, ज्यामुळे ईएक्स प्रत्यक्ष कोणत्याही सामान्य ५ ए किंवा १५ ए घरगुती सॉकेटमध्ये प्लग करून चार्ज करता येऊ शकते, ज्यामुळे स्वतंत्र चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता भासत नाही. रायडर्स बॅटरी २० टक्क्यांवरून ८० टक्क्यांपर्यंत साधारणपणे २ तासांत चार्ज करू शकतात, तर संपूर्ण ० ते १०० टक्के चार्जिंगसाठी सुमारे ४ तास लागतात. या मोटरसायकलमधील बॅटरी पॅकला नॅट्रॅक्सकडून मान्यता मिळालेली आहे, तर बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (बीएमएस) आयसीएटीद्वारे प्रमाणित आहे.
‘टीव्हीएस एनटॉर्क १२५’ आपल्या नवीन रंगांसह लॉन्च; एका क्लिकवर पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये
गतिशीलतेच्या पलीकडील इंटेलिजन्स
मोटरसायकलच्या पायामध्ये इंटेलिजन्स निर्माण करण्याच्या आपल्या तत्त्वज्ञानाशी बांधील राहत अव्होर इलेक्ट्रिक ईएक्समध्ये अधिक सर्वोत्तम, कनेक्टेड आणि सुलभ रायडिंग अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेल्या मालकीच्या तंत्रज्ञानाचा संच आहे.
या अनुभवाच्या केंद्रस्थानी अव्होर सेन्स ही कंपनीची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी एव्हीए आणि अव्होर सिनॅप्स या एआय-संचालित कॉम्पॅनियनसोबत काम करते, जे रायडर आणि मोटरसायकलमध्ये अधिक स्मार्ट व वैयक्तिक संवाद शक्य करते. हे आपोआप रायडिंगची आकडेवारी आणि रायडरच्या नोंदी कॅप्चर करते, ज्यामुळे वापरकर्त्यांना प्रत्येक प्रवास सहजतेने ट्रॅक करता येतो.
रायडिंग कार्यक्षमता आणि नियंत्रण सुधारण्यासाठी ईएक्सने अॅपेक्स हा आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स मोड, आणि सिफ्ट हा मॅन्युअल गिअर मोड सादर केला आहे, जो रायडर्सना पॉवर वितरणावर अधिक नियंत्रण देतो. याला पूरक म्हणून सर्वोत्तम रायडर इनपूटसाठी एआरएस आणि एकात्मिक ड्राईव्ह लिंक आर्म पॉवरट्रेन आर्किटेक्चर आहे, जे हाताळणी, समतोल आणि एकंदरीत रायडिंग गतिशीलता सुधारण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
दैनंदिन सोय लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या या मोटरसायकलमध्ये फ्लेक्स चार्ज हा १५०० वॅट ऑनबोर्ड फास्ट चार्जर आहे, जो सामान्य घरगुती सॉकेटमधून चार्जिंगची सुविधा देतो, तर स्प्लिट पॅक एनर्जी अव्होरचे साइड-बाय-साइड बॅटरी पॅक आर्किटेक्चर पॅकेजिंग, वजन वितरण आणि थर्मल व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे संतुलित करते. पीएएम+ पार्क असिस्टसारखी वैशिष्ट्ये कमी वेगात मन्युव्हरिंग (ड्रायव्हिंग) आणि पार्किंग अधिक सोपे करतात.
गाईड-मी-होम लाईट्स, ऑटो इंडिकेटर कट-ऑफ, अहोय! वेलकम लाईट्स आणि बीकन ही मोटरसायकलची सिग्नेचर टँक लायटिंग यांसारख्या अनेक विचारपूर्वक दिलेल्या सोयीस्कर आणि सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांमुळे रायडरचा अनुभव अधिक उत्साहवर्धक होतो. एर्गोनॉमिकली डिझाइन केलेला अर्गो फिट रायडिंग ट्रायंगल दैनंदिन प्रवास आणि लांबच्या प्रवासादरम्यान आरामदायी अनुभव देतो.
आत्मविश्वासासाठी डिझाइन केलेली मोटरसायकल. मालकीच्या विश्वासाने समर्थित.
अव्होर इलेक्ट्रिक ईएक्स भारतातील रस्त्यांच्या परिस्थितीनुसार अत्यंत कठोर सुरक्षितता, गुणवत्ता आणि टिकाऊपणाच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे विश्वासार्हता आणि दीर्घकालीन मालकी हक्काप्रती अव्होर इलेक्ट्रिकची कटिबद्धता अधिक दृढ होते. अव्होर इलेक्ट्रिकने १,००,००० + पेक्षा जास्त किमीचे रोड टेस्टिंग, २,५०० + पेक्षा जास्त तासांचे डायनामोमीटर व्हॅलिडेशन आणि भारतातील विविध रस्त्यांच्या परिस्थितींमध्ये रायडर्सद्वारे केलेल्या व्यापक चाचण्यांद्वारे आपल्या तंत्रज्ञानाची पडताळणी केली आहे.
ईएक्स सर्व लागू भारतीय सुरक्षितता आणि गुणवत्ता मानकांचे पालन करते, आणि तिचे प्लॅटफॉर्म एआयएस १५६ आणि एआयएस ०३८ सुरक्षितता मानकांचे पालन करते. बॅटरीला ५ वर्षे / ६०,००० किमीची सर्वसमावेशक वॉरंटी दिली आहे, जी मन:शांती आणि दीर्घकालीन मालकीचा आत्मविश्वास प्रदान करते.
स्वदेशी तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर आधारित
ईएक्सला ऊर्जा पुरवणारे अव्होर सोर्स हे अव्होर इलेक्ट्रिकचे मालकीचे तंत्रज्ञान स्टॅक आहे आणि एव्हीआर प्लॅटफॉर्म हे खास डिझाइन केलेले इलेक्ट्रिक मोटरसायकल आर्किटेक्चर आहे.
गेल्या तीन वर्षांत, कंपनीने अहमदाबाद येथील आपल्या समर्पित संशोधन आणि विकास (आरअँडडी) केंद्रात नऊपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण वेईकल सिस्टम्स पूर्णपणे स्वतः डिझाइन केल्या आहेत. यामध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (बीएमएस), बॅटरी पॅक, मोटर, मोटर कंट्रोलर, पॉवर कंट्रोल मॉड्युल, डीसी-डीसी कन्व्हर्टर, ऑनबोर्ड फास्ट चार्जर, डिस्प्ले सिस्टम आणि मालकीची ऑपरेटिंग सिस्टम यांचा समावेश आहे.
कंपनीने १२० पेक्षा जास्त इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अर्ज देखील दाखल केले आहेत, ज्यामुळे भारतात सर्वात व्यापक स्वदेशी ईव्ही तंत्रज्ञान इकोसिस्टम स्थापित करण्यात आली आहे. हा वर्टिकली इंटिग्रेटेड दृष्टिकोन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये अधिक दृढ एकत्रीकरण साधण्यास मदत करतो, तसेच सुधारित गुणवत्ता, विश्वासार्हता आणि जलद नाविन्यता प्रदान करतो.
या महत्त्वाच्या लाँचबाबत मत व्यक्त करत अव्होर इलेक्ट्रिकचे संस्थापक प्रियंक राखोलिया म्हणाले, ”ईएक्स लाँच करण्यापूर्वी आम्ही तीन वर्षे संशोधन, विकास, चाचणी आणि पडताळणी केली, ज्यामुळे या श्रेणीतील सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि नाविन्यता सुनिश्चित करता येईल. विश्वासार्हता, सातत्य आणि आर्थिक सुलभता प्रदान करणाऱ्या भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी तंत्रज्ञान स्टॅकला नवीन उंचीवर नेताना आम्ही जागतिक दर्जाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी जागतिक दर्जाच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी उपायांचा वापर आणि पोहोच वाढवणे हे आमचे ध्येय आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, ईएक्स ही त्या दिशेने आमच्या प्रवासाची केवळ सुरुवात आहे.”