Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदा चार्ज करा अन् 169 किमी फिरा! Yamaha ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 भारतात दाखल

यामाहा या दुचाकी उत्पादक कंपनीने भारतीय मार्केटमध्ये त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रिक स्कूटर Yamaha EC-06 सादर केली आहे. चला या स्कूटरच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 02, 2026 | 07:23 PM
एकदा चार्ज करा अन् 169 किमी फिरा! Yamaha ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 भारतात दाखल

एकदा चार्ज करा अन् 169 किमी फिरा! Yamaha ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 भारतात दाखल

Follow Us
Follow Us:
  • यामाहाने भारतात लाँच केली त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर
  • Yamaha EC-06 भारतीय ऑटो बाजारात दाखल
  • जाणून घ्या किंमत
भारतीय ऑटो बाजारात एकापेक्षा इलेक्ट्रिक वाहनं लाँच होताना दिसत आहे. ग्राहक देखील या वाहनांना भरभरून प्रतिसाद देताय. सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी मिळतेय. त्यामुळेच ओला इलेक्ट्रिक किंवा Ather सारख्या कंपन्यांच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. नुकतेच Yamaha ने देखील भारतीय मार्केटमध्ये त्यांची पहिलीवहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे.

यामाहाने भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर EC-06 सादर करत मोठा टप्पा गाठला आहे. इंडिया यामाहा मोटर (IYM) प्रा. लि.ने या स्कूटरची एक्स-शोरूम (दिल्ली) किंमत Rs. 1,67,600 जाहीर केली आहे. ही स्कूटर सुरुवातीला निवडक शहरांमध्ये यामाहाच्या प्रीमियम Blue Square शोरूम्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

तुमची आमची आवडती बाईक महागली! आता TVS Raider 125 खरेदी करण्यासाठी ‘इतके’ अतिरिक्त पैसे द्यावे लागणार

EC-06 ही स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर 169 किमी प्रमाणित रेंजसह येते, त्यामुळे ती दैनंदिन शहरी प्रवासासाठी एक आकर्षक पर्याय ठरते. आधुनिक डिझाइन, मजबूत बॉडी स्टान्स आणि यामाहाच्या डीएनएशी सुसंगत स्टायलिंगमुळे ही स्कूटर तरुण ग्राहकांना आकर्षित करेल, असा कंपनीचा दावा आहे.

या स्कूटरमध्ये IPMSM मोटर आणि 4 kWh फिक्स्ड बॅटरी देण्यात आली आहे. यामधून 79 kmph टॉप स्पीड, 26 Nm टॉर्क आणि 6.7 kW पॉवर मिळते. स्कूटर साधारण 8 तासांत पूर्ण चार्ज होते. बॅटरीवर 3 वर्षे किंवा 30,000 किमी वॉरंटी देण्यात आली आहे.

रायडर्सच्या गरजेनुसार EC-06 मध्ये Eco, Standard आणि Power असे तीन राइडिंग मोड्स देण्यात आले आहेत. तसेच रिव्हर्स मोड, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, रिअर कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन, 200 mm फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स आणि CBS यांसारखी फीचर्स देण्यात आले आहेत.

Toyota Fortuner ची हवा टाइट! MG Motors च्या ‘या’ पॉवरफुल SUV चा टिझर रिलीज

डिजिटल कलर LCD डिस्प्ले, LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स, तसेच Yamaha Motor Connect R ॲपमुळे कनेक्टेड फीचर्सही उपलब्ध आहेत. याशिवाय, सीटखाली 24.5 लिटर स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे अध्यक्ष हाजीम ओटा यांनी सांगितले की, EC-06 हे शाश्वत शहरी मोबिलिटीच्या दिशेने यामाहाचे महत्त्वाचे पाऊल असून, भारताच्या कार्बन-न्यूट्रल भविष्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.

Web Title: Yamaha launched their first ever electric scooter yamaha ec 06 in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 07:23 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • Yamaha

संबंधित बातम्या

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर
1

Mahindra Thar OG भारतात लॉन्च; किंमत Rs. 10.32 लाखांपासून सुरु! पाहा फीचर्स आणि इंटेरियर

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास
2

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!
3

60 देशांतील 1.5 लाख रायडर्स एका मिशनसाठी एकत्र! Royal Enfield One Ride 2026 चा हिमालयाच्या संवर्धनासाठी मोठा विक्रम!

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स
4

Royal Enfield Classic 350 Signature White Edition लॉन्च; किंमत Rs. 2.24 लाख! मिळणार ही 5 खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.