फोटो सौजन्य: Pinterest
एमजी मोटर्स भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असते. आता कंपनी लवकरच MG Majestor ला नवीन एसयूव्ही म्हणून लाँच करण्याची तयारी करत आहे. नुकतेच लाँच होण्यापूर्वी, या एसयूव्हीचा दुसरा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.
Budget 2026: ग्राहकांनो लागा तयारीला! ‘या’ एका निर्णयामुळे Nexon-Punch आणि Windsor EV होणार स्वस्त
ऑटोमेकर एमजी लवकरच एमजी मॅजेस्टरला नवीन एसयूव्ही म्हणून लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी, कंपनीने एसयूव्हीचा दुसरा टीझर रिलीज केला आहे, जो त्याच्या एक्टीरिअर लूकची झलक देतो. टीझरनुसार भारतात ही एसयूव्ही 12 फेब्रुवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.
कंपनीने सोशल मीडियावर जारी केलेल्या दुसऱ्या टीझरमध्ये काळ्या रंगातील एसयूव्ही दाखवण्यात आली आहे. 30 सेकंदांच्या व्हिडिओ टीझरनुसार या एसयूव्हीमध्ये एलईडी डीआरएल, कनेक्टेड एलईडी टेललाइट, मोठी फ्रंट ग्रिल, स्किड प्लेट आणि रूफ रेल्स यांसारखे डिझाइन एलिमेंट्स पाहायला मिळतात.
एमजी मोटर्सकडून Majestor मध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, फ्रंटला मोठी ग्रिल, 20 इंच अलॉय व्हील्स, ड्युअल टोन एक्स्टिरियर, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल टोन इंटिरिअर, टाइप-सी यूएसबी चार्जिंग पोर्ट, पुश बटन स्टार्ट/स्टॉप, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग पोर्ट आणि ड्रायव्हिंगसाठी विविध मोड्स दिले जाऊ शकतात.
Skoda Kylaq खरेदी करताय? मिळू शकतो मोठा अपडेट! CNG पर्यायासह लाँच होईल SUV
प्रवाशांच्या सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, हिल असिस्ट, बीएसडी, एलसीए, आरसीटीए, डीओडब्ल्यू, सेल्फ अॅडॅप्टिव्ह क्रूझिंग आणि ADAS सारखी अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे.
सध्या कंपनीकडून इंजिनबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय मिळू शकतात. पेट्रोल इंजिनमधून 184 किलोवॅट पॉवर आणि 410 न्यूटन मीटर टॉर्क मिळण्याची शक्यता आहे, तर टर्बो डिझेल इंजिनमधून 160 किलोवॅट पॉवर आणि 500 न्यूटन मीटर टॉर्क मिळू शकतो.
दोन्ही इंजिनसोबत 4X4 ड्राइव्हची सुविधा दिली जाऊ शकते. पेट्रोल व्हेरिएंटची टॉप स्पीड 190 KMPH आणि डिझेल व्हेरिएंटची टॉप स्पीड 175 KMPH असू शकते. यामध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात येण्याची शक्यता आहे.






