Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या वर्षाची नवी सुरुवात! गुढीपाडवानिमित्त अवघ्या 4999 रुपयात घरी आणा यामाहा Fascino, ‘या’ दुचाकींवर देखील मोठी सवलत

गुढीपाडव्‍याच्‍या शुभ प्रसंगी यामाहाने खास महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी त्यांच्या बाईक आणि स्कूटरवर विशेष सवलत जाहीर केली आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या दुचाकींवर ग्राहकांना सवलत मिळणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 14, 2026 | 08:08 PM
गुढीपाडवानिमित्त अवघ्या 4999 रुपयात घरी आणा यामाहा Fascino

गुढीपाडवानिमित्त अवघ्या 4999 रुपयात घरी आणा यामाहा Fascino

Follow Us
Close
Follow Us:
  • गुढीपाडवानिमित्त Yamaha ची विशेष ऑफर
  • यामाहा R15 सिरीजवर मिळतेय सूट
  • यामाहा RayZR 125 Fi Hybrid वर देखील स्‍पेशल ऑफर
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर Yamaha Motor ने महाराष्ट्रातील ग्राहकांसाठी आपल्या लोकप्रिय बाईक आणि स्कूटर रेंजवर विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समुळे ग्राहकांना यामाहाची आधुनिक तंत्रज्ञान असलेली दुचाकी अधिक परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या ऑफर्समुळे ग्राहकांना नववर्षाची सुरुवात स्टाइल, परफॉर्मन्स आणि नव्या अनुभवासह करता येईल.

गुढीपाडवा निमित्त जाहीर करण्यात आलेल्या या ऑफर्समध्ये यामाहाच्या काही लोकप्रिय मॉडेल्सवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये Yamaha R15 Series या स्पोर्ट्स बाईकवर 70 व्या अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल प्राइस अंतर्गत ऑन-रोड किमतीवर सुमारे 6,000 रुपयांपर्यंत बचत मिळत आहे. त्यामुळे ही आयकॉनिक सुपरस्पोर्ट बाईक खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे.

तसेच Yamaha RayZR 125 Fi Hybrid या स्कूटरवरही विशेष ऑफर देण्यात आली आहे. 70 व्या अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल प्राइस अंतर्गत ग्राहकांना सुमारे 7,000 रुपयांपर्यंत बचत मिळू शकते. स्पोर्टी डिझाइन आणि आधुनिक फीचर्समुळे ही स्कूटर तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

आमचा देखील एक काळ होता! भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ‘या’ 4 Diesel Cars अचानक का झाल्या गायब?

याशिवाय Yamaha Fascino 125 Fi Hybrid वर देखील आकर्षक गुढीपाडवा ऑफर देण्यात आली आहे. या स्कूटरसाठी फक्त 4,999 रुपयांपासून डाउन पेमेंट योजना उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे स्टायलिश आणि इंधन बचत करणारी ही स्कूटर सणासुदीच्या काळात अधिक किफायतशीर ठरत आहे.

त्याचप्रमाणे Yamaha FZ-S Fi Hybrid या प्रगत हायब्रिड बाईकवर देखील खास EMI योजना उपलब्ध आहे. या बाईकसाठी 7,999 रुपयांपासून डाउन पेमेंट पर्याय देण्यात आला असून, परफॉर्मन्स आणि इंधन कार्यक्षमतेसह किफायतशीर पर्याय म्हणून ती ग्राहकांसमोर सादर करण्यात आली आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, या सर्व गुढीपाडवा उत्सवी ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्राहकांना यामाहाच्या स्टायलिश दुचाकी खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

Hyundai Verna vs Virtus: कोणती कार सेफ्टीच्या बाबतीत एकदम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

दरम्यान, यामाहाच्या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओमध्ये Yamaha YZF-R15M, Yamaha YZF-R15 V4, Yamaha MT-15 V2 आणि Yamaha FZ-X यांसारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. तसेच स्कूटर श्रेणीत Yamaha Aerox 155, Yamaha Fascino 125 Fi Hybrid आणि Yamaha RayZR 125 Fi Hybrid यांसारखी लोकप्रिय मॉडेल्स उपलब्ध आहेत.

Web Title: Yamaha motors gudi padwa offer on motorcycles and scooter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Gudi Padwa
  • Yamaha

संबंधित बातम्या

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का
1

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का

वाहनधारकांनो सावधान! आता विना ‘PUC’ फिरणे पडणार महागात; दंडाच्या रकमेत मोठी वाढ, जाणून घ्या नवे नियम
2

वाहनधारकांनो सावधान! आता विना ‘PUC’ फिरणे पडणार महागात; दंडाच्या रकमेत मोठी वाढ, जाणून घ्या नवे नियम

Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या
3

Lamborghini च्या Fenomeno Roadster ची जगभर चर्चा! का आहे इतकी खास? इंजिन किती दमदार? जाणून घ्या

कारचा AC ऑन करताच दुर्गंधी येतेय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून मिळवा फ्रेश हवा; आरोग्यासाठीही आहे महत्त्वाचे
4

कारचा AC ऑन करताच दुर्गंधी येतेय? ‘या’ सोप्या टिप्स वापरून मिळवा फ्रेश हवा; आरोग्यासाठीही आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.