फोटो सौजन्य: Pinterest
Verna आणि Virtus या दोन्ही कारच्या टॉप मॉडेलमध्ये फक्त ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. Verna मध्ये ग्राहकांना जास्त पर्याय उपलब्ध आहेत. यात टर्बो पेट्रोल इंजिनसोबत Naturally Aspirated पेट्रोल इंजिनचाही पर्याय दिला जातो.
तर Virtus च्या GT Plus व्हेरिएंटमध्ये फक्त 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. मात्र, Virtus च्या इतर किफायतशीर व्हेरिएंटमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे.
स्वस्त ऑटोमॅटिक कार हवीय? Kia Sonet ने आणली मार्केटमध्ये नवी कार; किंमत आहे इतकी खास…
दोन्ही कारमध्ये LED लाईट्स आणि 16-इंच अलॉय व्हील्स दिलेले आहेत. तसेच ऑटो-फोल्डिंग ORVMs सुद्धा मिळतात. फॉग लॅम्प्सच्या बाबतीत Virtus थोडी पुढे आहे, कारण या कारमध्ये पुढे आणि मागे दोन्ही बाजूंना फॉग लॅम्प्स दिले आहेत. याशिवाय दोन्ही कारमध्ये रियर स्पॉयलर आहे. Verna मध्ये मोठा विंग स्पॉयलर दिला आहे, तर Virtus मध्ये डिक्कीच्या कडेला छोटा आणि स्टायलिश स्पॉयलर आहे.
दोन्ही कार आकर्षक रंगांमध्ये आणि मॅट फिनिशमध्ये उपलब्ध आहेत. मात्र Verna मध्ये ड्युअल-टोन पेंटचा पर्याय मिळतो. Virtus चा टॉप मॉडेल स्पोर्टी आणि क्रोम एलिमेंट्ससह येतो, ज्यामुळे ती अधिक स्टायलिश दिसते.
फीचर्सच्या बाबतीत Verna थोडी आघाडीवर दिसते. यात मोठी इन्फोटेनमेंट आणि डिजिटल डिस्प्ले स्क्रीन, मेमरी फंक्शनसह पॉवर ड्रायव्हर सीटसाठी अधिक अॅडजस्टमेंट, फ्रंट पॅसेंजर सीटसाठी इलेक्ट्रिक बॉस मोड आणि रियर सनशेड मिळते. दुसरीकडे Virtus मध्ये पॉवर फ्रंट पॅसेंजर सीटसाठी अतिरिक्त अॅडजस्टमेंट तसेच 60:40 स्प्लिट रियर सीट फोल्डिंगची सुविधा दिली आहे, जी Verna मध्ये उपलब्ध नाही.
महागाईचा दणका! गॅसपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलची चिंता वाढली; ‘या’ गाड्या देतील सगळ्यात जास्त मायलेज…
सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही कार मजबूत आहेत. दोन्हीमध्ये ABS, TPMS, ESC आणि ऑटो-डिमिंग IRVM सारखे फीचर्स दिले आहेत. मात्र, Verna मध्ये काही आधुनिक तंत्रज्ञानाचे फीचर्स अधिक मिळतात, जसे की 360 डिग्री कॅमेरा, लेव्हल 2 ADAS, जास्त एअरबॅग्स आणि पार्किंग सेन्सर्स. हे फीचर्स Virtus मध्ये उपलब्ध नाहीत.
सुरक्षेच्या बाबतीत Volkswagen Virtus ला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे, त्यामुळे ही कार खूप सुरक्षित मानली जाते. Autocar India च्या माहितीनुसार, नवीन Verna चे अद्याप टेस्टिंग झालेले नाही, पण तिच्या आधीच्या मॉडेललाही 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली होती.






