Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यामाहाची ‘एक्सप्लोर इंडिया ऑन XSR’ मोहीम मुंबईत दाखल; १०० हून अधिक उत्साही XSR155 रायडर्सचा सहभाग

स्वातंत्र्य, शोध आणि मोटरसायकल रायडिंगची आवड साजरी करत यामाहाची एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर मोहीम २,६०० किलोमीटरहून अधिक अंतर आणि वाटेतील प्रमुख ठिकाणे पार करून मुंबईत पोहोचली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 14, 2026 | 06:17 PM
यामाहाची ‘एक्सप्लोर इंडिया ऑन XSR’ मोहीम मुंबईत दाखल; १०० हून अधिक उत्साही XSR155 रायडर्सचा सहभाग
Follow Us
Follow Us:

इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि. ने आज आपल्या ऑल इंडिया ‘एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर’ मोहिमेचे मुंबईत आगमन झाल्याची घोषणा केली. देशभरातील शोध घेण्याची वृत्ती, एकता आणि मोटरसायकल रायडिंगच्या आवडीचा उत्सव साजरा करणाऱ्या या सातत्यपूर्ण ग्राहक-प्रवास उपक्रमातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. २ जून २०२६ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथून सुरू झालेल्या या मोहिमेत रायडर्सनी २,६०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर यशस्वीरित्या पार केले आहे. आपल्या २१ दिवसांच्या आणि ६,००० किलोमीटरच्या प्रवासादरम्यान त्यांनी श्रीनगर, अमृतसर, अत्तारी, लुधियाना, दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद आणि दमण या प्रमुख ठिकाणांना भेट दिली आहे.

Yamaha XSR 155 आणि TVS Ronin समोरासमोर! इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक खाते जास्त भाव?

काश्मीर ते कन्याकुमारी अशा एका प्रतीकात्मक प्रवासाच्या स्वरूपात आखण्यात आलेल्या या उपक्रमाचा देशातील रायडर्सना एकत्र आणण्‍याचा आणि भारतातील समृद्ध सांस्कृतिक विविधतेचा उत्सव साजरा करण्‍यचा मनसुबा आहे. हा उपक्रम प्रदेश, भाषा आणि पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन मोटरसायकल रायडिंगमुळे निर्माण होणारा सामायिक बंध अधोरेखित करतो. साहसाची भावना अंगीकारून उत्साही रायडर्सद्वारे हा प्रवास केला जात आहे, ज्यामध्ये यामाहाची मॉडर्न-रेट्रो स्पोर्ट्स बाईक XSR155 त्यांच्या सोबतीला आहे. ही मोटरसायकल अभिजात (टाइमलेस) डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख मेळ साधते.

या प्रवासाच्या मुंबई टप्प्याचा एक भाग म्हणून, यामाहाने एका विशेष एक्‍सएसआर कॅफे राइडचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शहरातील एक्‍सएसआर प्रेमींच्या वाढत्या समुदायाला एकत्र आणण्यात आले. या मेळाव्यात १०० हून अधिक XSR155 मालकांनी (ओनर्स) रायडर्सचे उत्साहात स्वागत केले आणि त्यांच्या या देशव्यापी मोहिमेबद्दल त्यांच्याशी संवाद साधला. ‘एक्सप्लोर इंडिया ऑन एक्सएसआर’ मोहिमेचा अविभाज्य भाग असलेल्या या उपक्रमांच्या माध्यमातून यामाहाचे आपल्या ब्लू स्ट्रीक्स कम्युनिटीला अधिक प्रबळ करण्‍याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम विविध पार्श्वभूमीच्या यामाहा रायडर्सना बाईक रायडिंगची सामायिक आवड आणि यामाहा ब्रँडवरील प्रेमाच्या धाग्याने एकत्र आणतो, ज्यातून दीर्घकालीन नातेसंबंध आणि आजीवन ब्रँड अॅम्बेसेडर तयार होतात.

खिशावर भर पडायचा काही थांबत नाही! Yamaha च्या ‘या’ Scooter ची किंमत ‘इतक्या’ रुपयांनी वाढवली

रायडर्स महामार्ग, पर्वतीय रस्ते, शहरी भाग आणि किनारी भागांमधून आपला प्रवास पुढे चालू ठेवत असताना हा उपक्रम मोटरसायकलची टिकाऊ क्षमता दाखवण्‍यासह यामाहा आणि तिच्या रायडर्सची व्याख्या ठरणारी साहसी वृत्ती व आवड देखील अधोरेखित करतो.

XSR155 ही यामाहाची मॉडर्न-रेट्रो स्पोर्ट्स मोटरसायकल आहे, ज्यामध्ये व्हेरियबल व्हॉल्व्ह अॅक्ट्युएशन (व्‍हीव्‍हीए) तंत्रज्ञानाने सज्ज असलेले १५५ सीसी लिक्विड-कुल्ड, ४-स्ट्रोक, एसओएचसी, ४-व्हॉल्व्ह इंजिन देण्यात आले आहे आणि ही मोटरसायकल यामाहाच्या विश्वासार्ह डेल्टाबॉक्स फ्रेमवर तयार करण्यात आली आहे. ही मोटरसायकल ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीसीएस) आणि असिस्ट अँड स्लिपर क्लच सारख्या प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. एकत्रितपणे, ही वैशिष्ट्ये परफॉर्मन्स, गतिशीलता आणि रायडरचा आत्मविश्वास यांचा उत्तम मेळ साधतात, ज्यामुळे ही मोटरसायकल वेगवेगळ्या रस्त्यांवर आणि हवामानाच्या परिस्थितीत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अत्यंत योग्य ठरते.

Web Title: Yamahas explore india on xsr campaign in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 06:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.