फोटो सौजन्य: Pinterest
दोनचाकी वाहन निर्माता Yamaha Motor Company भारतात विविध सेगमेंटमध्ये आपली उत्पादने विकते. अलीकडील अहवालांनुसार, कंपनीने आपल्या लोकप्रिय स्कूटर Yamaha Ray ZR 125 Fi Hybrid च्या किंमतीत वाढ केली आहे. या वाढीबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.
मार्च 2026 मध्ये Maruti Suzuki ची ‘ही’ कार ठरली ग्राहकांची फेव्हरेट, जाणून घ्या टॉप 5 कार
यामाहा Ray ZR हा स्कूटर सेगमेंटमधील लोकप्रिय पर्याय आहे. कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत वाढ केली असून, ही वाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
माहितीनुसार, कंपनीने या स्कूटरच्या किंमतीत 660 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ सर्व व्हेरिएंट्सवर लागू करण्यात आली असून, Rally Hybrid आणि Standard Hybrid या दोन्ही प्रकारांतील सर्व व्हेरिएंट्स यामध्ये समाविष्ट आहेत.
Yamaha Ray ZR Street Rally स्कूटरमध्ये 125cc FI Hybrid इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन 8.2 PS पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क निर्माण करते, ज्यामुळे स्कूटर चांगली परफॉर्मन्स देते.
या स्कूटरमध्ये कंपनीने काही आधुनिक फीचर्स दिले आहेत. यामध्ये Answer Back, फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Y-Connect फीचर, फ्रंट डिस्क ब्रेकसह UBS, टेलिस्कोपिक सस्पेंशन, मल्टी-फंक्शन की-स्विच, पास स्विच, 21 लिटर बूट स्पेस, LED DRL, LED हेडलाइट्स तसेच SMS आणि कॉल अलर्ट यांसारखे फीचर्स समाविष्ट आहेत.






