• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Dada Kondke Suprehit Movie Nrps

दादा कोंडके ‘इजा बिजा तिजा’ सुपर हिट…

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 27, 2023 | 06:00 AM
दादा कोंडके ‘इजा बिजा तिजा’ सुपर हिट…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘सोंगाड्या’ (पुणे शहरात प्रदर्शित १२ मार्च १९७१)ची मुंबई, पुण्यापासून दूरदूरवरच्या खेड्यापाड्यात भारी क्रेझ, त्यातील काय गं सखू, मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी या गाण्यांनी तर लग्नातील बॅण्डपासून बारशाच्या लाऊडस्पीकरपर्यंत आणि लहान मोठ्या ऑर्केस्ट्रापासून सहलीतील भेंड्यांपर्यंत सगळीकडेच धमाल उडवलेली. पिक्चरने अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल गर्दीत वाटचाल केली आणि या सगळ्यात हुकमाचा राजा ‘दादा कोंडके’. ढोपरापर्यंत ढगाळ पॅन्ट, लोंबणारी नाडी, अर्ध्या हाताचा मोठ्या आकाराचा कुर्ता, केसांचा जणू पैलवान कट, बारीक मिशी, वागण्यात भाबडेपण, वेंधळपण, ढोबळ ग्राम्य भाषेत नाॅनस्टाॅप बकबक. ‘दादा कोंडके यांचे हे रुपडं’ पब्लिकला आवडले आणि एकदा का अशी पसंती मिळाली की ती क्रेझ वर्षभरात नवीन चित्रपट पडद्यावर आणून कॅश करायला हवी. ही व्यावसायिक रणनीती.

याच वातावरणात ‘एकटा जीव सदाशिव’ (पुणे शहरात अलका टाॅकीजला प्रदर्शित ३१ मार्च १९७२) आला. योगायोगाने त्याच दिवशी पुण्यात चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ प्रभातला प्रदर्शित झाला. दोन्ही सुपर हिट. आजही दोन्हीची गाणी हिट. इजा, बिजानंतर तिजा हवाच. बळकटी देण्यासाठी. आता दादा कोंडके यांची ग्रामीण नायक आणि विनोदाची वेगळी शैली अशी इमेज तळागाळातील रसिकांच्या मनावर फिट्ट झाली होती. पहिल्या दोन्ही चित्रपटांची कथा पटकथा व संवाद वसंत सबनीस यांचे, तर दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांचे होते. आता दादांनीच कथा लिहिली. पटकथा जगदीश खेबूडकर यांनी लिहिली. संवाद व दिग्दर्शन दिनेश यांचे. (प्रभाकर पेंढारकर यांचे टोपणनाव दिनेश) गीते जगदीश खेबूडकर व दादा कोंडके यांची आणि संगीत प्रभाकर जोग यांचे. पहिल्या दोन चित्रपटांना राम कदम यांचे संगीत होते.

दादा कोंडके यांनी असे बदल केले आणि चित्रपटाचे नाव ‘आंधळा मारतो डोळा’. नायिका म्हणून अंजना मुमताजची निवड. (उषा चव्हाणशी जोडी शोभून आणि जमूनही हा बदल का?) कारण, नायिका शहरी. त्यामुळेच तशी नायिका हवी. धुमाळ, जयशंकर दानवे, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी, रजनी चव्हाण, सरस्वती बोडस, शांता तांबे, संपत निकम, दामोदर गायकवाड आणि पाहुणी कलाकार अरुणा इराणी.

पिक्चरची थीम काय? दादा कोंडके यांची धमाल दुहेरी भूमिका. शहरात कृष्णकुमार आणि गावात भीमा. पब्लिकला एकाच तिकीटावर दोन- दोन दादा कोंडके ही फुल्ल एंटरटेनमेंट पर्वणी. भीमाला पिक्चरचं वेडं असते. त्याला वाटतं आपण मुंबईला जावूया नशीब पालटेल. कृष्णकुमारला त्याचे काका (जयशंकर दानवे) छळत असतात. त्याला मावशी (सरस्वती बोडस) वाढवते तर त्याचं बहिणीवर (रजनी चव्हाण) प्रेम आहे. कृष्णकुमार नेमका भीमाच्या गावात जातो तेव्हा कृष्णकुमारचे सवंगडी (धुमाळ वगैरे) त्याला भीमा समजतात तर मुंबईत भीमाला कृष्णकुमार समजतात. कृष्णकुमारची प्रेयसीही (अंजना) फसते. यातून होणारी गंमत जंमत, गडबड गोंधळ, अफलातून धुमाकूळ म्हणजेच, ‘आंधळा मारतो डोळा’ (पुणे शहरात मिनर्व्हा थेटरात प्रदर्शित ३१ ऑगस्ट १९७३. म्हणजेच पन्नास वर्ष पूर्ण).

दादा कोंडके यांनी यशाची हॅटट्रिक साधली हे महत्वाचे. दादांचा पिक्चर रिलीज होतो ते पंचवीस आठवडे मुक्काम करण्यासाठीच. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत. पुण्यानंतर काही आठवड्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा वगैरे करत मुंबईत दाखल. गिरगावातील सेन्ट्रल आणि दादरचे कोहिनूर थेटरात प्रदर्शित. त्या काळात एकाच वेळेस अनेक मराठी व हिंदी चित्रपट सुपर हिट, म्हणून नवीन चित्रपट कायमच थिएटरसाठी वेटींग लिस्टवर. ते पथ्यावरही पडे. तोपर्यंत गाणी लोकप्रिय. ‘आंधळा मारतो डोळा’ची गाणी आजही हिट. दादा कोंडके गीतलेखनातही विशिष्ट शैली होती. प्रसंगाचा मूड त्यात ते पकडत आणि त्याच गाण्याच्या पडद्यावरच्या सादरीकरणाचे भान त्यांना असे. चल रं शिरपा देवाची किरपा, ऐशी वर्षाची असून म्हातारी सांगतीया वय सोळा खोटं काय म्हणता आंधळा मारतो डोळा, हिल हिल पोरी हिला तुझ्या कप्पालीला टिला (या गाण्यात दादा कोंडके आणि अरुणा इराणीने धमाल उडवली), पोरं मी लहान बालिका अजान, नाना पुरे करा हा फाजिलपणा आता लय झालं ही या चित्रपटातील दादा कोंडके यांनी लिहीलीत. तर जगदीश खेबूडकर यांची जीव भोळा खुळा कसा लावू लळा, अजून रंगाची हळद ही गाणी आहेत. दादा कोंडके यांना लोकसंगीताचा कान फारच चांगला. म्हणून तर नेहमीच ते गाण्यात भारी ठरत आणि गाणी हिट तर पिक्चरला रिपिट रन हमखास. ही गाणी आशा भोसले, उषा मंगेशकर व जयवंत कुलकर्णी यांनी गायलीत. चित्रपटाचे छायाचित्रणकार त्यागराज पेंढारकर आणि संकलन दादांचे हुकमी एन. एस. वैद्य. दादा कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत शूटिंगचा डेरा टाकत. हाही चित्रपट तेथेच चित्रीत झाला. हिल हिल पोरी हिलाचे शूटिंग चेंबूरच्या आशा स्टुडिओत झाले तर चित्रपटातील काही प्रसंग गॅन्ट्र रोडच्या ज्योती स्टुडिओत चित्रीत झाली.

दादांनी ओळीने तीनही चित्रपट हिटची साधलेली हॅटट्रिक त्यानंतर ते चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत ‘पांडू हवालदार’ (१९७५) पासून पुढे कायम राहीली. ती इतकी की दादांचे हेच हिट पिक्चर कालांतराने एक आठवड्यासाठी पुन्हा पुन्हा प्रदर्शित होत गर्दी खेचत राहिले आणि आता तर झी टाॅकीजवर त्यांच्या रामराम गंगाराम, सासरचं धोतरं इत्यादी धमाल पिक्चर दाखवताना पुन्हा दादा कोंडके फ्लॅशबॅक जोरात. दादा कोंडके यांनी आपले गुरु भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘तांबडी माती’ (१९६९) पासून चित्रपट माध्यम व व्यवसायात पाऊल टाकले. पण त्यांना इमेज व हुकमी ऑडियन्स ‘सोंगड्या’ने दिला. तो कायम ठेवण्यातील एक फंडा ‘आंधळा मारतो डोळा’चा!

दिलीप ठाकूर

Web Title: Dada kondke suprehit movie nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • dada kondke

संबंधित बातम्या

‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला ‘दादा कोंडके पुरस्कार’ जाहीर,  अभिनेत्याने मानले चाहत्यांचे आभार
1

‘झापुक झुपूक’ स्टार सूरज चव्हाणला ‘दादा कोंडके पुरस्कार’ जाहीर, अभिनेत्याने मानले चाहत्यांचे आभार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.