Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीळ गूळ घ्या, गोड-गोड बोला

वास्तविक तिळगुळ देण्यामागील भाव असा आहे की तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे आणि गुळाची गोडी हे आत्मिक प्रेमाचे प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या मनात बंधुभाव निर्माण व्हावा आणि सर्व एकजुटीने राहावे हा त्यामागचा भाव आहे. आत्मिक एकता व मधुरतेचा संदेश देणारा हा सण नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जातो. ‘वसुधैवं कुटुम्बकम’ची भावना सर्वांच्या मनात बसवणारा हा सण आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 15, 2023 | 06:41 AM
तीळ गूळ घ्या, गोड-गोड बोला
Follow Us
Close
Follow Us:

पौष महिन्यात येणारा संक्रांतीचा सण हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातला एक महत्वाचा उत्सव आहे.  ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ असे एकमेकांना म्हणत नवे जुने स्नेहाचे धागे अधिक घट्ट करण्याचा व एकमताने वागण्याचा संदेश देणारा हा मंगल दिन आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या पुढील सहा महिन्याच्या कालखंडात उत्तर गोलार्ध अधिक प्रकाशमान होणार ही संक्रमण स्थिती ‘मकरसंक्रांती’ म्हणून ओळखली जाते. प्रकाशाच्या मार्गावर नेणारे उत्तरायण शुभ व पवित्र समजले जाते. तसेच या सणानिमित्त आपल्या संस्कृतीतील प्रथा स्नेहवर्धनाची दीक्षा देतातच पण जीवनातले चढ-उतार पचवण्याची शक्ती ही देतात. अवघे जीवन हे सुख-दुःखाच्या दुहेरी धाग्यांनी विणलेले! जसे मकरसंक्रांत म्हणजे प्रकाशाने अंध:कारावर मिळवलेला विजय तसेच आपण ही सुखद आठवणींनी दुःखावर विजय प्राप्त करूया.

भारतीय संस्कृतीमध्ये या दिवसाला फार महत्वाचे स्थान आहे. सुगडं पुजणं, बोराचे वाण एकमेकींना देणं, विस्तवावर दूध उतू घालवण. या आणि अशा पारंपरिक प्रथा घरोघरी दिसून येतात. हळदीकुंकू लावून तिळगुळाचे लाडू देऊन ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ अशी प्रेमळ विनंती एकमेकांना करतात. एकमेकांमधले हेवे-दावे विसरून जाण्याचा हा दिवस. आज प्रत्येक नाते हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यातला दुरावा समाप्त करण्याचा हा दिवस. वास्तविक तिळगुळ देण्यामागील भाव असा आहे की तीळ हे अतिशय सूक्ष्म असलेल्या मनुष्य आत्म्याचे प्रतीक आहे आणि गुळाची गोडी हे आत्मिक प्रेमाचे प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या मनात बंधुभाव निर्माण व्हावा आणि सर्व एकजुटीने राहावे हा त्यामागचा भाव आहे. आत्मिक एकता व मधुरतेचा संदेश देणारा हा सण नवीन वर्षाच्या सुरुवातीला साजरा केला जातो. ‘वसुधैवं कुटुम्बकम’ची भावना सर्वांच्या मनात बसवणारा हा सण आहे. जाती, लिंग, स्तर यांपासून थोडे दूर जाऊन प्रत्येकाबद्दल मनात आत्मीयता वाढावी म्हणून हा सण साजरा केला जातो.

संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची पद्धत आहे.  मोकळ्या वातावरणात, आकाशाच्या छपराखाली उभे राहून तासनतास पतंग उडवत राहण्याची ही कल्पना किती छान! थंडीच्या सरत्या दिवसात सुर्याखाली उभं राहून पतंग उडवायचा. लाल, निळे, हिरवे, पिवळे…  रंगबिरंगी लहान-मोठे पतंग आकाशात उडत असतात.  कुणाचे पतंग झरझर वर चढतात, तर कुणाचे पतंग तिथल्या तिथे आकाशात झेप घेत-घेत सपकन खाली येतात. आपल्या कुशल हातानी आपल्या पतंगाला कधी ढील देत, कधी खेचत दिशा देत कुणी दुसऱ्यांचे पतंग कापून काढतो. साऱ्या आयुष्याचा खेळ. प्रत्येक जण आयुष्यभर हा खेळ खेळत असतो. आपापले आशेचे, ध्येयाचे पतंग आयुष्यभर उडवीत असतो. आपल्या कुवतीनुसार त्याला दिशा देतो. ज्याला प्रयत्नपूर्वक साध्य केलेल्या कुशलतेने हे जमते, त्याचा पतंग आकाशात उंच-उंच जातो. तो उंचीवर असा काही स्थिरावतो की जणू काही त्याला अढळ पदच मिळालंय आणि बाकीचे इतस्ततः कुठे ना कुठे अडकलेले ! काही तर फाटके -तुटके पतंगच गोळा करणारे ! मुळात सूत्रधाराची पकड व्यवस्थित हवी, कौशल्य कमावलेले हवे. वाऱ्याची योग्य दिशा मिळताच सरसरून पुढे जाणारे हात हवे.  आयुष्याच्या या मुक्त गगनात आपल्या ध्येयाचे पतंग उंच उंच उडवता यावे ही कला सर्वांना मिळू दे.

खेळाच्या मैदानातून बाहेर येताच हारजीत विसरणारे मन हवे, कारण आपण सारे एकाच नावेचे प्रवासी. ‘कभी हार तो कभी जीत’ हा जीवनाचा नियम समजून एकमेकांविषयी स्नेहभाव जपत या छोट्याशा आयुष्याला विराम द्यायचा आहे. सगळ्यांचे जीवन धकाधकीचे, तणावग्रस्त आहे पण जो आपल्या संपर्कात येईल त्यांना माझ्याकडून सुख लाभावे ही काळजी घ्यावी. सुखाची, ज्ञानाची, सन्मानाची, शक्तींची… देवाण-घेवाण जरूर करा पण दुःख, ईर्षा, घृणा… यांचे वाण देणे संपवूया. तरच हा स्नेहदिप सदा प्रकाश मार्गाने पुढे जात राहील.

चला, तर नवीन वर्षाची सुरुवात सद्भावनेने, नवीन आशेने उंच ध्येयाकडे वाटचाल करणारे राहो. सर्व संबंध स्नेहाच्या धाग्याने घट्ट बांधलेले राहो. खरंतर मनुष्य स्वतःसाठी प्रगती व दुसऱ्यासाठी प्रेम याचीच आस धरून वाटचाल करतो. या मकरसंक्रांतीच्या सणानिमित्ताने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो. प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात यश लाभू दे. जसे तीळ आणि गूळ एकमेकांशी जोडलेले असतात तसेच कुटुंबातील सर्व नाती प्रेमाने एकमेकांशी घट्ट जोडलेली राहूदे हीच शुभकामना.

– नीता बेन

bkneetaa24@gmail.com

Web Title: Take sesame jaggery talk sweetly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 06:40 AM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • shitij news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
2

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
3

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध
4

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.