Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannes Festival 2026 : नाकात नथ, सोळा श्रृंगार; Cannes Film Festival मध्ये प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा

Cannes Festival 2026 : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मराठमोळा लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचा रेड कार्पेटवरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 18, 2026 | 05:07 PM
Cannes Festival 2026 : नाकात नथ, सोळा श्रृंगार; Cannes Film Festival मध्ये प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा
Follow Us
Follow Us:
  • नाकात नथ, सोळा श्रृंगार;
  • Cannes Film Festival मध्ये प्राजक्ता माळीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा
Cannes Festival 2026 : आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठीत अशा कान्स फेस्टिव्हलला पहिल्यांदा मराठी कलाकारांनी देखील उपस्थिती लावली आहे. मराठी सिनेविश्वाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडत असून 79 हा कान्स फेस्टिव्हल महाराष्ट्रासाठी काहीसा विशेष ठरला आहे हे नक्की. या फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत पुष्कर जोग या मराठमोळ्या कलाकाराची देखील एन्ट्री झाली. याचशिवाय अशोक सराफ, निवेदिता सराफ, अंकिता वालावलकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकार देखील उपस्थित होते.

काय म्हणाली प्राजक्ता माळी ? 

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मराठमोळा लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचा रेड कार्पेटवरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत प्राजक्ता लिहिते की, The world famous “Red Carpet of Cannes Film Festival”.कान्सच्या रेड कार्पेटवर अस्सल पारंपरिक नथ- नऊवार नेसून चालण्याचा, जगाला मराठी ठसका दाखवल्याचा आनंद अवर्णनीय आहे. आणि अशा प्रकारे मराठीने “Main Red Carpet of Cannes Film Festival” मध्ये Debut केला.या आधी जे मराठी कलाकार कान ला गेले ते हिंदी हिंग्लीश चित्रपट किंवा वेगळ्या रेड कार्पेटवर चालले. तिथे ४-५ वेगवेगळ्या थिएटर्समध्ये फिल्म्स चालू असतात. आम्ही मराठी कलाकार मराठी भाषेच्या प्रसारार्थ चाललो ह्याचा अत्यानंद आहे. असं प्राजक्ताने कॅप्शन लिहिलं.

Cannes Festival 2026 मध्ये मराठीचा डंका, पैठणी, खण मराठमोळ्या संस्कृतीने इंग्रजांचेही दिपले डोळे

कान्सच्या रेडकार्पेटवर प्राजक्ता माळीच्या पारंपरिक लुकवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या. अभिनेत्रीने आकाशी रंगांची नऊवारी नेसली. महाराष्ट्रीयन नथ, चोकर-स्टाईल नेकलेस, चंद्रकोर , कंबरपट्टा यांसारखे पारंपरिक दागिने परिधान करून महाराष्ट्रीयन संस्कृतीचा साज फिरंग्यांचा देशात अभिमनाने दिसत होता. आकाशी रंगाची नऊवारी त्यावर गडद निळ्य़ा रंगाचा ब्लाऊस आणि साडीला गुलाबी रंगाची किनार. प्राजक्ताचा हा मराठमोळी साज मन वेधून घेणारा होता. पारंपरिक दागिन्य़ांबरोबरच प्राजक्ताने हातावर काढलेली चंद्रकोर मेहंदी देखील उठून दिसत होती.

तिच्या या लुकवर चाहत्यांनी कौैतुकाचा वर्षाव केला आहे. “प्राजक्ता आम्हाला तुझा अभिमान वाटतोय” असं म्हणत सर्वांनी तिचं कौतुक केलं आहे. यासह प्रार्थना बेहेरे, अभिज्ञा भावे, मेघा धाडे, दीप्ती लेले अशा अनेक मराठी कलाकारांनी देखील प्राजक्तावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कान्समध्ये मराठीचा झेंडा अटकेपार रोवला गेल्याने मनोरंजन विश्वात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Web Title: Cannes festival 2026 nose piercing sixteen makeup looks fans are in awe of prajakta malis marathi look at cannes film festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • prajakta mali

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.