Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत; वनविभाग सतर्क, नागरिकांना सावधतेचे आवाहन

Mira Bhayander : भाईंदर पश्चिमेतील राई गाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी संशयित बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 18, 2026 | 05:19 PM
mira bhayander news

mira bhayander news

Follow Us
Follow Us:
  • मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत
  • वनविभाग सतर्क, नागरिकांना सावधतेचे आवाहन
मिरा-भाईंदर/विजय काते : भाईंदर पश्चिमेतील राई गाव परिसरात शुक्रवारी काळी संशयित बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची घटना समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, संबंधित प्राणी खरोखरच बिबट्या आहे की अन्य वन्यप्राणी, याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिमेतील शिवम गार्डन परिसरातील एका महिला रहिवाशाने आपल्या इमारतीच्या बाल्कनीतून मोकळ्या मैदानात फिरणाऱ्या एका प्राण्याचा व्हिडिओ चित्रित केला. व्हिडिओमध्ये तो प्राणी इमारतीमागील गटारालगतच्या जागेत शांतपणे फिरताना दिसत असून काही वेळातच तो नजरेआड झाल्याचे सांगितले जात आहे.

कुंभार्ली अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

नागरिकांना सावधतेचे आवाहन

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरात पाहणी करून संबंधित प्राण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेकदा जंगली मांजर किंवा तत्सम प्राणी दूरवरून बिबट्यासारखे भासू शकतात. त्यामुळे केवळ व्हिडिओच्या आधारे निष्कर्ष काढणे शक्य नसून तपासानंतरच स्पष्ट माहिती समोर येईल.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाने नागरिकांना कमी प्रकाश असलेल्या किंवा निर्जन भागात एकटे जाणे टाळण्याचा सल्ला दिला असून, कोणताही संशयास्पद वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.जर संबंधित प्राणी बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले, तर त्याला सुरक्षितपणे जंगल क्षेत्राकडे वळवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

Bhayander News : शिवरायांच्या पुतळ्याचा वाद विकोपाला; दुरुस्ती की स्थलांतराचा डाव? मनसेचा प्रशासनावर सणसणीत आरोप

Web Title: Mira bhayander leopard terror again in mira bhayander forest department alert appeal to citizens to be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत 20 झाडे कोसळली; दुचाकीस्वार गंभीर जखमी, पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.