आयसीआयसीआय प्रुडेन्शियलतर्फे इएसजी म्युच्युअल फंड योजना
आयसीआयसीआय प्रुडेन्शियलतर्फे इएसजी म्युच्युअल फंड योजना

  • पर्यावरण, सामाजिक दृष्टीकोन आणि उत्तम प्रशासन या तीन इएसजींवर भर देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये मुदत मुक्त प्रकारातील या फंडाची गुंतवणूक

मुंबई : पर्यावरण (एनव्हार्नमेंट-ई), सामाजिक दृष्टीकोन (सोशल-एस) आणि दर्जेदार प्रशासन (गव्हर्नन्स-जी) या तीन इएसजींवर अधिकाधिक भर देणाऱ्या कंपन्यांमध्ये सातत्यपूर्ण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल (ICICI Prudential) म्युच्युअल फंडाने (mutual fund) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इएसजी हा मुदत मुक्त प्रकारातील नवीन फंड (new fund) बाजारात आणला आहे. या कंपन्यांसाठी निश्चित केलेल्या घटकांआधारे त्यांना इएसजी गुणांक दिले जाणार असून त्यानंतरच या कंपन्यांची निवड करत त्यात गुंतवणूक (investment) केली जाणार आहे.

जबाबदारीचे भान राखत गुंतवणूक करण्याच्या वाढत्या प्रवाह आणि गरजेकडे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इएसजी फंड लक्ष देणार आहे. इएसजी गुणांकात उत्तम सातत्य राखणाऱ्या कंपन्यांतील गुंतवणूकीचे फायदे हा फंड गुंतवणूकदारांना मिळवून देणार आहे. नवीन फंड गुंतवणूकीसाठी २१ सप्टेंबरला खुला होणार असून ५ ऑक्टोबर २०२० रोजी बंद होणार आहे.

नवीन फंडाची घोषणा करताना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा म्हणाले की, सातत्यपूर्ण गुंतवणुकीला अनुसरुन उत्तम गुंतवणूक वाढत आहे. येत्या काही वर्षात भारतात इएसजी पध्दतीने गुंतवणूक करण्याचा नवीन प्रवाह येणार आहे. भारतातील तरुण पिढी विशेषत: मिलेनियल पिढी इएसजी घटकांबाबत अधिक जागरुक झालेली असून गुंतवणूक करताना ते याचा सखोल विचार करतात. यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनात तरुण पिढी गुंतवणूक करताना उत्तम इएसजी गुणांक असणाऱ्या कंपन्यांच्या चेक बॉक्समध्ये निवडीची खुण करताना आढळतात. विशेषत: पर्यावरण आणि सामाजिक घटकांना कमी धोका निर्माण करणाऱ्या तसेच रोख निधीचा उत्तम प्रवाह, कर्जउभारणीसाठी कमी खर्च आणि विश्वासपुर्ण परतावा देणाऱ्या कंपन्यांना तरुण पिढी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक माहिती देताना शहा यांनी सांगितले की, इएसजीला प्राधान्य देणाऱ्या कंपन्या या अधिक वाढ दर्शवितात. या कंपन्यांच गुंतवणूकदारांना उत्तम संपत्ती निर्माण करतील आणि बाजार घसरणीच्या काळातही या कंपन्या स्थिरता दाखवू शकतात.

भारतात इएसजी संकल्पना ही अद्यापही बाल्यावस्थेत असून त्याचे लाभ मिळविण्याच्या खूप संधी आहेत. त्या तुलनेत जागतिक पातळीवर इएसजी आधारीत गुंतवणूक खूपच प्रचलित झालेली आहे. मॉर्निगस्टार डायरेक्ट या संस्थेने डिसेंबर २०१९ मध्ये प्रकाशित केलेल्या अहलावानुसार इएसजीआधारीत गुंतवणूक २००९ मध्ये २१ अब्ज डॉलर होती. ती २०१९ मध्ये १५४ अब्ज डॉलरवर झेपावली आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीच्या या नवीन योजनेचे व्यवस्थापन समभाग गुंतवणूक विभागाचे उप सीआयओ मृणाल सिंग हे करणार आहेत.