'या' बॅंकेच्या कर्जावरील व्याजदरात मोठी वाढ; वाचा... काय आहे बॅंकेचे नवीन व्याजदर!
देशातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शनिवारी (ता.३) चालू आर्थिक वर्ष 2024-25 पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) आकडे जाहीर केले. यामध्ये बँकेला 17,035 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी पहिल्या तिमाहीत झालेल्या बँकेच्या नफ्यापेक्षा यावेळचा नफा हा 0.9 टक्क्यांनी अधिक आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेला 16,884.29 कोटी रुपयांचा नफा झाला होता. या तिमाहीत मिळालेले व्याज रु. 1,11,526 कोटी होते. जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत नोंदवल्या गेलेल्या 95,975 कोटी व्याजापेक्षा 16 टक्क्यांनी अधिक आहे.
निव्वळ व्याज उत्पन्नातही झाली वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेने 57,041 कोटी रुपयांच्या तुलनेत 70,401 कोटी रुपये खर्च केले. हे वार्षिक आधारावर 23 टक्के अधिक आहे. पहिल्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 41,125 कोटी रुपये होते. जे गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 5.71 टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 38,905 कोटी रुपये होते.
हेही वाचा : भारतातील परकीय चलन साठ्यात मोठी घट; वाचा… काय आहे नेमकं घटीमागील कारण!
एनपीए 0.57 टक्क्यांपर्यंत झाला कमी
पहिल्या तिमाहीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एनपीएमध्ये मोठी घट झाली आहे. बँकेने नोंदवलेल्या तिमाहीत तिची निव्वळ नॉन-परफॉर्मिंग ॲसेट 14 बीपीएसने कमी करून, 0.57 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यश मिळविले आहे. जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 0.71 टक्के होते. बँक कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीला कर्ज देते. जेव्हा कर्जाची रक्कम 90 दिवसांपर्यंत बँकेत परत केली जात नाही, तेव्हा ती एनपीए म्हणून घोषित केली जाते.
बँकेच्या उत्पन्नात 13.55 टक्क्यांनी वाढ
बँकेच्या एकूण उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेचे उत्पन्न 13.55 टक्क्यांनी वाढून, 1,22,687 कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेचे उत्पन्न 1,08,038 कोटी रुपये झाले होते. मात्र, बँकेच्या उत्पन्नात तिमाही आधारावर घट झाली आहे. त्यात 4.45 टक्के घट झाली आहे. तर बँकेचे मार्केट कॅप सध्या 7.56 लाख कोटी रुपये इतके आहे.
काय आहे शेअरची स्थिती?
सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चा शेअर 847.75 रुपयांवर आहे. शुक्रवारी (ता.२) बाजार बंद झाला तेव्हा तो 1.73 टक्क्यांनी घसरला होता. गेल्या 6 महिन्यांत बँकेच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे 32 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, एका वर्षात बँकेने गुंतवणूकदारांना 43.56 टक्के रिटर्न्स दिले होते. 5 वर्षांत गुंतवणूकदारांची रक्कम दुपटीने वाढली आहे. या कालावधीत त्यांना सुमारे 175 टक्के परतावा मिळाला आहे.